बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही त्याच्या भविष्यासोबत….’; रविना टंडनही भडकली, बॉलिवूड तारकांचा आर्यनला पाठिंबा, !

मुंबई | शनिवारी एनसीबीनं मुंबई-गोवा-मुंबई जाणाऱ्या क्रुझवर छापा टाकला. या छाप्यात ड्रग्ज करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. चौकशीनंतर आर्यनला अटक करण्यात आलं. त्याच्या अटकेनंतर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता अभिनेत्री रविना टंडननही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्यन खानला सध्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तेव्हापासून आर्यनवर अनेक टीका होत आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्री रविना टंडनने आर्यनला पाठिंबा दर्शवला आहे. तिच्या या पोस्टनं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

लाजीरवाणं राजकारण केलं जात आहे. एका तरुणाचं आयुष्य आहे आणि तुम्ही त्याच्या भविष्यासोबत खेळत राहतात. हे खूपच भयानक आहे, अशा आशयाचं ट्विट रविनानं केलं आहे.

दरम्यान, आर्यनच्या अटकेनंतर शाहरुख खानच्याही अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आर्यनसोबत शाहरुखलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. बाॅलिवूडमधून अनेकांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. तर काहींनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. राजकारणातही यामुळे वातावरण तापलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकला नाही आणि झुकणारही नाही”

सर्वोच्च न्यायालयाने केली लखीमपूर हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात

एनसीबीनंतर आता डीआरआयची मोठी कारवाई; मुंबईतून जप्त केले 25 किलो ड्रग्ज

“पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, मलाही ईडीची नोटीस पाठवली होती…”

ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 2 लाख नव्हे तर ‘इतक्या’ लाखांपर्यंत करता येतील व्यवहार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More