बंडखोरी शमली; रवींद्र भेगडेंचा बाळा भेगडेंना स्पष्ट पाठिंबा

पुणे | मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप युतीचे  उमेदवार बाळा भेगडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण भाजप विरोधी बंड शमल्याने मावळचे भाजप नेते रवींद्र भेगडे यांनी बाळा भेगडे यांना स्पष्ट पाठिंबा जाहीर केला आहे.

रविंद्र भेगडे यांना महायुतीकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर रवींद्र भेगडे यांचं बंड शमलं आहे. त्यांनी बाळा भेगडेंना पाठिंबा दिला आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघातून बाळा भेगडे दोनदा आमदार राहिले आहेत. त्यामुळे जर त्यांनी निवडणुकीत पुन्हा बाजी मारली तर त्यांच्यासाठी ती हॅट्रीक ठरणार आहे.

दरम्यान, मावळ मतदारसंघात भाजप युतीचे बाळा भेगडे आणि राष्ट्रावादी काँग्रेसचे सुनिल शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या रंगतदार लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-