महाराष्ट्र मुंबई

“हिंदू सणांवर बंदी हा महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोगाम असेल”

मुंबई | हिंदू सणांवर बंदी घालणे हा महाविकासाघाडीचा कॉमन मिनिमम पोग्राम असेल. पण ईश्वराने त्यांनी मंदिरे उघडण्याची सद्बुद्धी दिली, अशी खोचक टीका भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी केलीये.

सोमवारपासून राज्यातील मंदिरे खुली झाली आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांसह डोंबिवलीतील गणेश मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतलं. यावेळी ते बोलत होते.

मंदिरे उघडण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बहुधा हिंदू सणांवर बंदी घालणे, हा महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्राम असावा. मात्र, ईश्वराने सरकारला सद्बुद्धी दिली आणि त्यांनी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला, अशी टीका रवींद्र चव्हाण यांनी केली.

दरम्यान, तब्बल आठ महिन्यांनी भाविकांसाठी पुन्हा खुली झाली आहेत. राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं आजपासून खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

शेवटची ओवाळणी! शहीद ऋषिकेश जोंधळेंना बहिणीने ओवाळलं

काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी- कपिल सिब्बल

राज्याच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता म्हणजे कृष्णकुंज- संदीप देशपांडे

हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरलाय?- निलेश राणे

“बिहार निवडणुकीदरम्यान राहूल गांधी शिमल्यात लुटत होते पिकनीकची मजा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या