“पुणे उद्ध्वस्त केलं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही”; धंगेकरांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापलं

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे आजच्या दिवशी सर्वाधिक आक्रमक पाहायला मिळाले आहेत. पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना धंगेकर यांनी खडेबोल सुनावले आहे. पब आणि क्लब तसेच बारमधून अधिकाऱ्यांना हफ्ते जात असल्याचा आरोप आता धंगेकर यांनी केला आहे. अशातच त्यांनी अधिकाऱ्यांची लाजच काढली आहे.

रवींद्र धंगेकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी हफ्ते घेतले असल्याचा आरोप केला होता. त्यावर अधिकाऱ्यांनी धंगेकरांचा आरोप  खोटा असल्याचं वक्तव्य केलं आणि धंगेकरांचा आरोप फेटाळून लावला. आता अशातच रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापझाप झापलं आहे. धंगेकरांचा चांगलाच पारा चढल्याचं यावेळी दिसून आलं.

धंगेकरांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापलं

रवींद्र धंगेकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापलं आहे. हे सर्व खोटं असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला. त्यावर रवींद्र धंगेकर यांनी खडेबोल सुनावले आहे. ते म्हणाले की, मी आमदार नात्याने बोलत आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का? असं म्हणत धंगेकर यांनी सवाल केला आहे. तुम्हाला लाज कशी वाटत नाही?, मला म्हणता हे सर्व खोटं आहे, तुम्ही विधानसभेला उत्तर द्यायला उभे राहिलात का? असा सवाल करत धंगेकर यांनी कडक शब्दात सुनावलं आहे.

महिन्याला पैशाचे पाकीट पुरवले जाते

पुण्यातील नाईटलाईफला पाठिशी घालणाऱ्या सुपरीटेंडंट राजपूतला महिन्यात प्रत्येक हॉटेलमध्ये पैशाचे पाकीट पुरवले जाते, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. विमाननगर, कोरेगाव पार्क, बाणेर, हिंजवडी, भुगाव भुकुम, पिंपरी-चिंचवड, लोणावळा या ठिकाणी वसुली करणारे अनेक पोलीस अधिकारी तसेच काही कॉन्स्टेबल वसुली करतात.

कॉन्स्टेबल सागर धुर्वे, तात्या शिंदे, समीर पडवळ, स्वप्नील दरेकर, गोरे मेजर, गोपाल कानडे तसेच खाजगी व्यक्ती युवराज पाटील, मुन्ना शेख, रवी पुजारी, तानाजी पाटील, माऊनी शिंदे, राजु इ. व काही लायसन्स धारक जसे राहुल रामनाथ, सुन्नी सिंह होरा, बाळासाहेब राऊत पण वसुली करतात. असा आरोप धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केलाय.

News title – Ravindra Dhangekar Angry On Police Constable About Get Commission

महत्त्वाच्या बातम्या

“..म्हणून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही”; अजितदादांचा शरद पवारांवर गंभीर आरोप

गुरू रंधावा करतोय शहनाज गिलला डेट, म्हणाला “मला खूप छान वाटतं…”

अग्रवाल कुटुंबामुळे माझ्या मुलाने… तक्रारदार पित्याच्या आरोपांनी पुण्यात पुन्हा खळबळ

मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा उरकलं लग्न?, ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

सुनील टिंगरेंच्या अडचणी वाढल्या, डॅाक्टरच्या प्रकरणात पुन्हा आलं नाव