कसब्यात मतमोजणीला सुरुवात; रविंद्र धंगेकर आघाडीवर

पुणे | कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर कसब्यात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यावेळी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. त्यावेळी हेमंत रासने (Hemant Rasne) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.

भाजपचा बालेकिल्ला म्हणून कसबा मतदार संघ पहिला जातो. त्यामुळे कॉंग्रेसकडून कोणत्या दिग्गज नेत्याला उमेदवारी दिली जाईल याकडे लक्ष असतांना रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक बघायला मिळाली आहे.

आज मतमोजणी होत असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार असले तरी रवींद्र धंगेकर यांनी आपला विजय निश्चित असून 15 हजार मतांच्या फरकाने मी विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. पहिल्या फेरीत रविंद्र धंगेकर आघाडीवर होते.

भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-