‘महिला पोलिसही पबमध्ये…’; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ

Pune Porsche accident | पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे बिल्डर विशाल अग्रवाळ यांच्या अल्पवयीन मुलाने कारने दोघांना चिरडलं. यात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी वेदांत अग्रवाल याला कोर्टाने 15 तासांच्या आत जामीन देखील दिला. यामुळे राजकारण पेटलं आहे. या प्रकरणी विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातंय.

या प्रकरणी वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. अशातच विशाल अग्रवालच्या कुटुंबीयांचे छोटा राजनसोबत संबंध असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिस तपासावर देखील संशय व्यक्त केला जातोय. आता कॉँग्रेस नेते आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केलाय.

“फक्त दाखवण्यापुरतं फडणवीस पुण्यात..”

देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुण्यात येऊन या प्रकरणाची चौकशी केली होती. यावर देखील धंगेकर यांनी टीका केलीये. “राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले. पण पुण्यातील बिल्डर लॉबी त्यांच्यावर प्रेशर टाकू शकते. हा फार्स असू शकतो. हे फक्त दाखवण्यापुरता, पुणेकरांच समाधान करण्याकरता देवेंद्र फडणवीस आले होते. या प्रकरणात तपास अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने तपास केला, त्याच्यावर आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही हे फक्त दाखवण्यापुरता देखावा होता”, असा आरोप धंगेकर यांनी केलाय.

पुणे पोलिसांनी तपासात चूका केल्या

इतकंच नाही तर, “आरोपीला कोर्टात हजर केलं, तेव्हा गंभीर कलम नव्हती. मग, जज स्वत:ची चार कलम टाकून शिक्षा देणार का? पुणे पोलिसांनी तपासात चूका केल्या. पुणे पोलिसांनी पैशे घेतले. फाईव्ह स्टार ट्रीटमेंट दिली. पिझ्झा पार्टी झाली. लाल कार्पेट घालून पोलीस आरोपीला सोडण्यासाठी त्याच्या घरापर्यंत गेले होते” असा संताप यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केला.

पुढे त्यांनी पुणे पोलिसांवर जोरदार (Pune Porsche accident ) हल्लाबोल केला. “विशाल अग्रवाल हा बिल्डर पहिल्यापासून डिफॉल्टर आहे. महापालिकेकडे असलेल्या त्याच्या कामात तो डिफॉल्टर आहे. स्ट्रक्चर ऑडिट झालेलं नाही. पुणे महापालिकेला बिल्डरकडून पैसे येण बाकी आहे.अशी बिल्डर लॉबी भाजपासाठी काम करते, त्यावर आमचं काही म्हणणं नाही. पण पुणेकरांचा यामध्ये नाहक बळी जातोय.”,असं धंगेकर म्हणाले आहेत.

“पबमध्ये महिला पोलिसही असतात”

पुढे त्यांनी पब संस्कृतीवर देखील (Pune Porsche accident ) टीका केली. “पब संस्कृती बंद झाली पाहिजे.पब आहे तिथे आरडा-ओरडा गडबड, गोंधळ चालतो. हे हफ्तेखोर पोलीस मदत करतात. पोलिसांचे यामध्ये पैसे आहेत, ते सुद्धा भागीदार आहेत. पोलीस पब पार्टीमध्ये असतात. दु:ख म्हणजे महिला पोलीस कॉन्स्टेबलही तिथे असतात. पोलीसच असे वागत असतील तर सर्वसामन्यांना न्याय कसा मिळणार?”, असा सवाल देखील यावेळी धंगेकर यांनी केला.

News Title –  Ravindra Dhangekar Serious Allegation On Police In Pune Porsche accident

महत्त्वाच्या बातम्या-

‘माझा मुलगा निष्ठांवत अन् कणखर’; पित्याकडून मुलाचं तोंडभरून कौतुक

पोलिसांना शिवीगाळ करणं भाजप नेत्याला पडलं महागात, अखेर…

‘अमोलने एकनाथ शिंदेंची ऑफर नाकारली’; गजानन किर्तीकरांचा मोठा खुलासा

गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी महाराष्ट्रातलं अख्खं गाव विकत घेतलं!

महेंद्रसिंह धोनीने घेतला सर्वांत मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाला..