नवी दिल्ली | भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा आणि पूनम यादव यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तर आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिट दीपा मलिक यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कार निवड समितीने 2 दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मेर्झबान पटेल (हॉकी), रंबीर सिंग खोक्कर (कब्बडी) आणि संदीप भारद्वाज (क्रिकेट) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विपुल कुमार (बॅडमिंटन), संदीप गुप्ता (टेबल टेनीस), मोहिंदर सिंग ढिल्लोन (अॅथलेट) यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
-भाजपचे जेष्ठ नेते अरूण जेटली उपचार घेत असलेल्या एम्स रूग्णालयात भीषण आग
-विधानसभा लढण्यावर एकनाथ खडसे म्हणतात…
-‘आमचं ठरलंय… जय महाराष्ट्र!’; रश्मी बागल शिवसेनेत प्रवेश करणार??
-…म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेस भरवणार टिकटॉक स्पर्धा!
Comments are closed.