मुंबई | सध्या आयपीएलनं सगळ्यांनाच वेड लावलं आहे. काल झालेल्या सामन्यात चेन्नईचा (CSK) पराभव करत आरसीबीने (RCB) पुन्हा एकदा गुणतालिकेत टॉप 4 मध्ये जागा मिळवली आहे. कालच्या सामन्यात चेन्नईचा पराभव झालाच मात्र आणखी एक अपघात झाल्याचं पहायला मिळालं.
रविंद्र जडेजा आता कुठे तणावातून बाहेर पडून मैदानात उतरत असतानाच त्याला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चेन्नईचं टेंशन आणखी वाढलं आहे.
फिल्डिंग करताना जडेजाकडून पुन्हा एकदा कॅच सुटला आणि दुखापतही झाली. रविंद्र जडेजा खांद्यावर पडला त्याच्या डोक्यालाही थोडी दुखापत झाली. त्याच्या पडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दरम्यान, जडेजाला दुखापत होताच फिजीओ लगेच मैदानात आले आणि त्यांनी जडेजाला थोडा व्यायाम करायला सांगितला. त्यामुळे आता जडेजा पुढच्या सामन्यात खेळणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ –
Ravindra Jadeja injured! pic.twitter.com/JCR2XLQnUJ
— Cricketupdates (@Cricupdates2022) May 4, 2022
थोडक्यात बातम्या –
“भीमा कोरेगाव हिंसाचाराला फडणवीस सरकार जबाबदार”
“जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत….”; भाजप खासदाराचा गंभीर इशारा
मोठी बातमी ! तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणा रुग्णालयात दाखल
‘कायदा हातात घेण्याचे धाडस केल्यास…’; अजित पवारांचा राज ठाकरेंना गंभीर इशारा
Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा एका क्लिकवर
Comments are closed.