मुंबई | भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेला सुरुवात झालीये. मात्र टी-20 मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारताला एक मोठा धक्का बसलाय.
शुक्रवारच्या सामन्यात अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याला दुखापत झाल्याने पुढील 2 सामन्यांना तो मुकणार आहे. दरम्यान जडेजाच्या जागी टीम इंडियामध्ये मराठमोठ्या शार्दूल ठाकूरचा समावेश करण्यात आलाय.
वनडेच्या शेवटच्या सामन्या गोलंदाज शार्दूल ठाकूरने चांगली गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता टी-20 मध्ये जडेजा दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याच्याबदली शार्दूल ठाकूरचा समावेश केला आहे.
बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमअंतर्गत रवींद्र जडेजावर सध्या उपचार सुरु आहेत. तर उर्वरित दोन टी-20 सामन्यांसाठी तो उपलब्ध असणार नाही, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलंय.
महत्वाच्या बातम्या-
‘सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर…; या काँग्रेस नेत्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादीला इशारा
“महाविकास आघाडीने भाजपची कबर खोदायला सुरुवात केलीये”
“भाजपला भाजपचेच अहंकारी नेते कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल”
अमरावतीत भाजप आणि महाविकास आघाडीला धक्का; अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी
“अमित शहा आणि योगी आदित्यनाथ जिथे जिथे प्रचारासाठी गेले, तिथे भाजपचा पराभव झाला”
Comments are closed.