पुणे | डीएसकेंना कर्ज दिल्याप्रकरणी अटक झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मराठे यांना आणखी एक धक्का बसला असून त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले आहेत.
नुकतंच या प्रकरणी रविंद्र मराठेंना जामीन मंजूर झाला होता त्यानंतर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आज बँकेच्या पुण्यातील लोकमंगल या मुख्यालयात तातडीची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
तसंच रविंद्र मराठे यांच्यासह बँकेचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांचेही सर्व अधिकार काढून घेतले असून यापुढे दोघेही बँकेत कार्यरत राहणार असून त्यांना कोणतेही कार्यकारी अधिकार राहणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या –
-मराठा आरक्षण मिळू नये ही मुख्यमंत्र्यांची भूमिका!
-भाजप आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर भडकले!
-योगा करता करता बहाद्दराने चोरला बल्ब- पहा व्डीडिओ
-हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांना मंत्रालयाची पायरी चढू देऊ नये!
-बाळासाहेबांचं बोट धरून भाजप मोठा झाला-रामदास कदम
Comments are closed.