महाराष्ट्र मुंबई

म्हणून राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी धाडलं थेट मोदींना पत्र

Loading...

मुंबई | महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी भाषिकांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.

केंद्राने या आधी 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यात मराठी भाषेचाही समावेश करण्यात यावा यासाठी 2012 पासून महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आहे. मात्र अद्याप याबाबतचा निर्णय झालेला नाही.

Loading...

मराठीला मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी भाषा गौरवदिन म्हणुन साजरा केला जातो. मराठी भाषेचे प्राचीन शिलालेख, कोनशिला, ताम्रलेख भारतीय पुरातत्व विभागाकडे उपलब्ध आहेत, असं वायकर यांनी पत्रात लिहीलं आहे.

केंद्र सरकारला लागेल ती मदत राज्य सरकारकडून करायला आम्ही तयार आहोत. याबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर विचार करावा, असंही या पत्रात नमुद करण्यात आलं आहे.

Loading...

रविंद्र वायकर यांचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

Loading...

-अब्दुल सत्तारांमुळे माझा विजय पक्का- अंबादास दानवे

-शिवसेना नेते विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका

-या प्रमुख आश्वासनासह प्रकाश आंबेडकर यांनी वंचितचा जाहीरनामा केला प्रसिद्ध!

-तुमची चूक नसेल आणि नोटीशीत काही तथ्य नसेल तर घाबरू नका- गिरीश महाजन

-पूरग्रस्तांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी महेश लांडगेंनी घेतला स्तुत्य निर्णय

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या