बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन ‘या’ केंद्रीय मंत्र्याची ठाकरे सरकारवर बोचरी टीका, म्हणाले…

मुंबई | परमीबर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बवरुन महाराष्ट्रातील राजकाण ढवळून निघालं आहे. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आता या प्रकरणावर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रविशंकर प्रसाद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरे सरकारला आता नैतिक अधिकार उरला नसल्याची टीका रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. हे प्रकरण केवळ एका मंत्र्यांचं नाही, तर उद्धव ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित होत आहे. उद्धव ठाकरे यांची शांती काय सांगते? शरद पवार यांच्या शांत राहण्यामुळेही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विधानसभा आणि बाहेरही मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे यांना पाठीशी घालण्याच्या प्रयत्नावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचं रविशंकर प्रसाद म्हणालेत.

गृहमंत्री अनिल देशमुख सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करायला सांगतात. मग सचिन वाझेकडून अजून कोणती घाणेरडी कामं केली गेली?, असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी विचारलाय.

शरद पवार हे एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. सचिन वाझे अनेक वर्षे निलंबित होता. कोरोना काळात त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आलं. आता शिवसेना सचिन वाझेला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

…तर एवढ्या दिवस ते गप्प का बसले?- रूपाली चाकणकर

कोरोनाची भीती दाखवून सरकार दहशत माजवतंय- बंडातात्या कराडकर

“अनिल देशमुख यांच्याआधी उद्धव ठाकरेंचा राजीनामा घ्या, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”

“महाराष्ट्रात गृहविभाग नेमकं कोण चालवतंय; अनिल परब की अनिल देशमुख?”

“ठाकरे सरकार चोरांचं, खुन्यांचं असून ते बरखास्त करण्यात यावं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More