बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यांशी चर्चा केल्याशिवाय एनआरसी लागू होणार नाही; भाजप बॅकफुटवर

नवी दिल्ली | राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) या मुद्द्यांवरुन देशात अशांतता आणि अस्वस्थता आहे. अनेक लोक या मुद्यांविरोधात एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार बॅकफुटवर आल्याचं दिसत आहे.

राज्यांशी चर्चा केल्याशिवाय एनआरसी लागू केला जाणार नाही. त्याचबरोबर एनपीआरसाठी गोळा केलेल्या माहितीचा वापर एनआरसीसाठी केला जाणार नाही, असं केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं आहे. ते एका मुलाखतीदरम्यान बोलत होते.

अनेक राज्यांनी एनआरसीबाबत निरुत्साह दाखवला आहे. एनडीएतील महत्वाचा घटक पक्ष असणारे जदयूचे नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही एनआरसी राज्यात लागू करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे भाजपने आपली भूमिका मवाळ केल्याचं दिसतंय.

दरम्यान, एनआरसी बाबत भाजप सरकारमध्ये गोंधळाची स्थिती आहे. पंतप्रधान मोदी यांनी एनआरसीबाबत काहीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं होतं, तर गृहमंत्री अमित शहा यांनी देशभर एनआरसी लागू केले जाईल, असं म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More