नवी दिल्ली | इंटरनेटद्वारे आपले विचार मांडणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. मात्र, इंटरनेटचा वापर हा मूलभूत अधिकार नाही, असं मोठं वक्तव्य केंद्रिय प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केलं आहे. ते राज्यसभेत बोलत होते.
जम्मू काश्मिरमधील इंटरनेट बंदीच्या पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी हे वक्तव्य केलं आहे. काश्मिरमध्ये हिंसाचार तसंच अशांतता पसरवण्यासाठी दहशतवादी इंटरनेटचा वापर करत असतात. हे आपण कसं काय नाकारू शकतो? इंटरनेटपेक्षा सुरक्षा जास्त महत्वाची आहे, असं ते म्हणाले आहेत.
आपली मतं, कल्पना आणि विचारांची देवाण-घेवाण हा अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्याचा भाग आहे. मात्र इंटरनेटचा वापर हा मूलभूत अधिकार आहे, अशी मांडणी किंवा दावा आणखी कोणत्याही वकिलाने केलेला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे, असंही प्रसाद म्हणाले आहेत.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीरमध्ये अनेक दिवसांपासून इंटरनेट बंदी आहे. मात्र, या मुद्द्यावरुन विरोधकांनी भाजपवर अनेकदा टीका केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
इथून पुढे मी माझा पगार समाजासाठी वापरेल- रोहित पवार
नरेंद्र मोदी पाठीवर दंडे खातील पण तरूणांना रोजगार देणार नाहीत- नितीन राऊत
महत्वाच्या बातम्या-
भावाशी, मिसळचं झटको होयो तर येवा वैभववाडीत!
धक्कादायक; मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ती घोषणा फसवी!
“कुठला अंगारा, कुठला बाबा यांच्याकडे आहे माहित नाही, हे पुन्हा मंत्री झाले”
Comments are closed.