“काही घटक आमच्यावर नाराज; येणाऱ्या काळात आम्ही त्यांना न्याय देऊ”

मुंबई | काही घटक पक्ष आमच्यावर नाराज झाले आहेत, पण येणाऱ्या काळात आम्ही त्यांना न्याय देऊ, अशी सावध प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालात सत्ताधारी भाजपची जोरदार पिछेहाट झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

या निवडणुकीत जनतेने स्थानिक मुद्दयांवर मतदान केले आहे, मात्र लोकसभेला परिस्थिती वेगळी असणार आहे, असंही दानवे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीचे निकाल पूर्णत: भाजपच्या बाजूने लागतील, असा विश्वासही दानवे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या –

आता महाराष्ट्रात विजय मिळवू – पृथ्वीराज चव्हाण

-तेलंगणात पिछाडीवर असणाऱ्या काँग्रेसचे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह

-मध्य प्रदेशमध्ये निकाल फिरला; विजयी जल्लोष करणाऱ्या काँग्रेसला धक्का

-ओवैसींनी वादग्रस्त MIM नगरसेवक सय्यद मतीनला पक्षातून हाकललं!  

हे राहुलच्या मेहनतीचं फळ- सोनिया गांधी