विरोधात जाणाऱ्यांना आडवं करण्याची ताकद आमच्या पक्षात आहे- रावसाहेब दानवे

विरोधात जाणाऱ्यांना आडवं करण्याची ताकद आमच्या पक्षात आहे- रावसाहेब दानवे

कोल्हापूर | भाजप आणि शिवसेनेची युती व्हावी, अशी आमची इच्छा असून जे आमच्या सोबत न येता विरोधात जातील, त्यांना आडवं करण्याची ताकद आमच्या पक्षात आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिवसेनेसोबत आमची युती झाली नाही तर भाजप पक्षसंघटनेच्या ताकदीवर महाराष्ट्रातील सर्व जागा लढवण्याची आमची तयारी आहे, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

भाजप आणि शिवसेनेचा युतीचा निर्णय मुंबईमध्येच होईल, असं देखील रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, आम्ही केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा निवडून येऊ आणि नरेंद्र मोदीचं पुन्हा पंतप्रधान होणार, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“सीबीआय आणि ईडी हे तर भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष”

-संजय काकडे-अशोक चव्हाण यांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण

-कन्हैय्या कुमारविरोधात देशद्रोहापकरणी आरोपपत्र दाखल

-“जे बाळासाहेबांचं स्मारक बांधू शकले नाहीत ते राम मंदिर काय बांधणार”??

-उत्तर प्रदेशमध्ये भाजपची चिंता वाढणार?; भीम आर्मीचा पाठींबा सपा,बसपाला

Google+ Linkedin