शिवसेनेनं मागणी तर करावी त्यांना काय हवं आहे- रावसाहेब दानवे

नवी दिल्ली | युती करण्याची भाजपची तयारी आहे, शिवसेनेनं मागणी तर करावी त्यांना काय हवं आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.

युती बाबतची चर्चा अगोदर राज्य पातळवीर करणं महत्वाचं आहे आणि जर गरज पडली तर केेंद्र पातळीवर चर्चा व्हावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण याचा निर्णय जनता घेईल. मात्र, दिल्लीत याबाबत चर्चा होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, युती करण्याची आमची इच्छा आहे. पण आम्हाला युती हवी आहे हे जनतेला कळू द्या, असं त्यांनी म्हटलं

महत्वाच्या बातम्या-

-“आम्ही जे वायदे केले होते ते आम्ही पूर्ण केले, भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय”

-भाजपच्या युथ ब्रिगेडचा नवा नारा ‘मोदी अगेन’

-विखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

-“भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील”

-आलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले