जालना | जावई पडल्याचं दु:ख नाही, तेवढं चंद्रकांत खैरे पडल्याचं आहे, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेनेचा गड मानला जाणाऱ्या औरंगाबादमध्ये विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आहे. वंचित बहुजन आघाडीेचे इम्तिआज जलील यांनी याठिकाणी बाजी मारली.
दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हेही औरंगाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
दरम्यान, दानवेंनी युती धर्म पाळला नाही, त्यांनी जावयाला मदत केली, असा आरोप चंद्रकांत खैरेंनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
-संजय शिंदेंचा पराभव सहन न झाल्याने तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
-काल निवडून आलेला हा नातू आज आजोबांसाठी राजीनामा देण्याच्या तयारीत!
-ऐतिहासिक विजयानंतर बॉलिवुडमधून मोदींवर शुभच्छांचा वर्षाव
-पराभवानंतरही काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे ‘या’ शब्दांवर ठाम
-आनंदराव अडसूळ आजोबांचे आशीर्वाद नक्की घेईन- नवनीत राणा
Comments are closed.