बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपनं सुरु केलेल्या योजना बंद करु नका; रावसाहेब दानवेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

मुंबई | तत्कालिन फडणवीस सरकारच्या काही योजनांना ठाकरे सरकारने ब्रेक लावला आहे. तर काही योजनांना सरकार ब्रेक लावण्याच्या तयारीत आहे. यावर भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं असून भाजपने सुरू केलेल्या योजना बंद करू नका, असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.

मराठवाडा वॉटर ग्रीड ही तत्कालिन देवेंद्र फडणवीस सरकारची महत्वकांक्षी योजना होती. मात्र याच योजनेला ठाकरे सरकारने ब्रेक लावण्याचे संकेत दिले आहेत. मराठवाड्यासाठीची भाजपने सुरू केलेली अतिशय चांगली योजना आहे. ही योजना थांबवू नका किंवा स्थगिती देऊ नका, असं दानवे म्हणाले आहेत.

स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी आणीबाणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यांनी लढा दिला त्यांची पेन्शन सरकारने बंद करू नये, असंही दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने जुन्या सरकारच्या योजना रद्द करण्याचे प्रकार होताना दिसून येतात. ठाकरे सरकारने हाच कित्ता पुढे चालवला असल्याचं दिसून येत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सगळे निर्णय अजित पवार घेतायत अन् मुख्यमंत्री गोट्या खेळतायत”

पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय तरी काय?; प्रेमी युगलाला मारहाण करत तरूणीचा विनयभंग

महत्वाच्या बातम्या- 

अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये रंगला बॅडमिंटन सामना; विखेंचीही उपस्थिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More