विराट कोहली अजूनही सर्वोत्कृष्ट कर्णधार झालेला नाही!

सेंच्युरिअन | भारताचा कर्णधार विराट कोहली आणखी सर्वोत्कृष्ट कर्णधार झालेला नाही, असं मत दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक रे जेनिंग यांनी व्यक्त केलंय. कोहलीची वाहवाह होत असताना जेनिंग यांचं मत महत्त्वाचं मानलं जातंय. 

विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये दबदबा निर्माण करणारा कर्णधार असेल, मात्र त्याच्यात आणखी सुधारणेला वाव आहे. त्याला चांगला मार्गदर्शक मिळण्याची गरज आहे, असं देखील रे जेनिंग म्हणाले आहेत. 

धोनी धौर्यवान, तर विराट अगदी उलट आहे, अशा शब्दात त्यांनी धोनीची स्तुती केली. दरम्यान, रे जेनिंग विराटला 19 वर्षाखालील संघात असल्यापासून ओळखतात. ते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे प्रशिक्षक देखील होते.