RBI कडून ‘या’ दोन बँकांवर मोठी कारवाई; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

RBI Action | देशातील सर्वोच्च बँक आरबीआयने दोन मोठ्या बँकांवर कारवाई केली आहे.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांवर मोठी कारवाई केलीये. या कारवाई मागील धक्कादायक कारण देखील समोर आलंय.

आरबीआयने येस बँक आणि आयसीआयसीआय बँकेला नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी ठरवलंय. दोन्ही बँका दोषी आढळल्यामुळे आरबीआयने त्यांना मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे. आरबीआयकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बँकांना दंड आकारण्यात (RBI Action) येतो.

ICICI आणि YES बँकवर कारवाई

आरबीआयने येस बँकेला 91 लाख तर आयसीआयसीआय बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.या दोन्ही बँका काही मार्गदर्शक तत्वांचं पालन करत नव्हत्या. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

आरबीआयच्या माहितीनुसार येस बँकेला (RBI Action) ग्राहक सेवा आणि अतंर्गत कार्यालयीन खात्यांशी संबंधित नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी दंड ठोठावण्यात आला. येस बँकेने झिरो बॅलन्स खात्यामध्ये किमान रक्कम शिल्लक नसल्याचे कारण देत शुल्क वसूल केले होते.

आरबीआयकडून कारण आलं समोर

इतकंच नाही तर, बँकेने फंड पार्किंग आणि ग्राहक व्यवहारांना रुट करण्यासारख्या चुकीच्या कारणांसाठी ग्राहकांच्या नावावर काही अतर्गंत खाती उघडली आणि चालवली होती. 2022 मध्ये या चुका पुन्हा-पुन्हा करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे आरबीआयने कारवाई केली.

तर, आयसीआयसीआय बँकेने अपुऱ्या चौकशीच्या आधारे काही प्रकरणांमध्ये कर्ज दिली. यामुळे बँकेला वित्तीय संकटाचा सामना करावा लागला. आरबीआयला (RBI Action)चौकशीमध्ये आयसीआयसी बँकेच्या कर्ज मंजुरी प्रक्रियेत काही चुका आढळून आल्या होत्या. यामुळे दोन्ही बँकांना आर्थिक दंड दिला गेला.

News Title –  RBI Action on ICICI and YES Bank

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रह्मपुरीत पारा 47 अंशांच्या पार; ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा हायअलर्ट

“छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण उठसूट काहीही..”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा

आंद्रे रसेल अन् अनन्या पांडेचा डान्स व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग होणार तब्ब्ल ‘इतक्या’ कोटींच्या क्रूझवर, जाणून घ्या फंक्शनचं पूर्ण वेळापत्रक

हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाबाबत मोठी माहिती समोर