SBI नंतर आता पेटीएम पेमेंट्स बँकेला RBI चा दणका; केली ‘ही’ मोठी कारवाई
नवी दिल्ली | दोनच दिवसांपूर्वी रिझर्व बँक ऑफ इंडीयाने स्टेट बँक ऑफ इंडीयावर कारवाई करून तब्बल 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर आता आरबीआयने अजून एक मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला काही नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेने पेमेंट्स अँड सेटलमेंट सिस्टीम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावला असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. पेटीएम पेमेंट्स बॅंकेने कलम 26(2) चे उल्लंघन केल्याचे आढळल्याने आरबीआयकडून पेमेंट्स बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
याआधी आरबीआयने देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय बँकेवरही दंडात्मक कारवाई केली होती. एसबीआयने आरबीआयच्या निर्देशांचं पालन न केल्याने एसबीआयवर कारवाई करण्यात आली होती. आरबीआयने एसबीआयला याप्रकरणी 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
एसबीआयने रिझर्व बँक ऑफ इंडीया 2016 निर्देशाचं पालन न केल्याने एसबीआयवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. आरबीआयने याआधी वेस्टर्न युनियन फायनान्शिअल सर्विसविरोधातही दंडात्मक कारवाई केली होती. आता आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेविरोधातही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पेटीएम पेमेंट्स बँकेला खूप मोठा भूर्दंड बसला आहे.
थोडक्यात बातम्या-
“शिवसेना सोडणाऱ्यांच्या यादीत पहिलं नाव रामदास कदम यांचं होतं”
राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी
‘तो’ 500 कोटींचा घोटाळा सोमय्यांनी उघड करावा; संजय राऊतांच्या पत्राने राज्यात खळबळ
“कलम 370 रद्द करून फार मोठी चूक केली, त्याचा परिणाम आता भोगावा लागतोय”
करारा जवाब मिलेगा! चीन सीमेवर भारतीय लष्कराने तैनात केल्या बोफोर्स तोफा
Comments are closed.