CIBIL Rule l आजकाल कर्ज घेण्यासाठी सिबील स्कोर चांगला असणं खूप महत्वाचा आहे. कारण सिबील स्कोर चांगला असल्यास कर्ज लवकरात लवकर मंजूर होते. अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सिबिल स्कोरच्या नियांमध्ये बदल केले आहेत. आता नवीन नियमानुसार ग्राहकांचा सिबील स्कोर हा प्रत्येक 15 दिवसानंतर अपडेट केला जाणार आहे.
RBI ने सिबिल स्कोरच्या नियमांमध्ये केला मोठा बदल :
RBI च्या नवीन नियमांनुसार, ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर (CIBIL) दर 15 दिवसांनी अपडेट केला जाणार आहे. आरबीआयने बँका आणि वित्तीय संस्थांना क्रेडिट स्कोअर लवकर अपडेट करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. आरबीआय गव्हर्नर यांनी नुकतीच यासंदर्भात घोषणा केली असून क्रेडिट डेटा दर 15 दिवसांनी अपडेट केला जाईल असे त्यांनी सांगितले आहे. तसेच, दर दोन आठवड्यांनी ग्राहकांची क्रेडिट माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना (CIC) पाठवण्यास सांगितले आहे. यामुळे क्रेडिट स्कोअर लवकर अपडेट होईल, जो बँका आणि ग्राहक दोघांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
ग्राहकांचे CIBIL स्कोअर दर महिन्याच्या 15 तारखेला आणि महिन्याच्या शेवटी अपडेट केले जाऊ शकतात. क्रेडिट संस्था (CI) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (CIC) देखील 15 दिवसांच्या अंतराने डेटा अपडेट करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या निश्चित तारखा सेट करू शकतात. तसेच आता यापुढे क्रेडिट संस्थांना प्रत्येक महिन्याला ग्राहकाची क्रेडिट माहिती CIC कडे सादर करणे बंधनकारक असणार आहे.
CIBIL Rule l या लोकांना होईल फायदा :
RBI चा हा निर्णय कर्ज घेणारे आणि कर्ज देणाऱ्या या दोघांसाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण बँक आणि NBFC साठी योग्य क्रेडिट माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. हे त्यांना कोणाला कर्ज द्यायचे आणि कोणाला नाही याबद्दल अधिक चांगले निर्णय घेण्यासाठी मदत करेल आणि कर्जाचा व्याजदर निश्चित करण्यात मदत करेल. तसेच चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कमी दरात कर्ज देखील मिळू शकते.
विशेषत: क्रेडिट स्कोअर दर 15 दिवसांनी अपडेट केल्यास बँकांकडे ग्राहकांचा अचूक डेटा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कोणता ग्राहक कर्ज फेडण्यास सक्षम आहे आणि कोणता नाही हे समजणे सोपे होणार आहे व बँका योग्य ग्राहकाला योग्य व्याजदराने कर्ज देऊ शकतील. यामुळे डिफॉल्ट्सची संख्या होईल.
News Title : RBI CIBIL Rule Change
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! अजित पवारांच्या जीवाला धोका? कार्यकर्ते टेन्शनमध्ये
“दोन-चार कपडे काढले असते तर..”; विनेश फोगाटबद्दल भाजप नेत्याची वादग्रस्त पोस्ट
महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा
या राशीवर महादेवाची कृपा राहणार!
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर!