Top News देश

आरबीआयची आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद, या दोन मोठ्या घोषणा होणार?

मुंबई | रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. सरकराने याअगोदर अर्थव्यवस्थेला मंदीच्या खाईतून बाहेरून काढण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. आजच्या शक्तीकांता दास यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण आर्थिक जगताचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत कर्जाची सवलत आणखी तीन महिन्यांना वाढवली जाऊ शकते, असा अंदात वर्तवण्यात येत आहे आणि सगळ्यांना हीच अपेक्षा लागून राहिलेली आहे. याचसंदर्भातली चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे. तसंच 20 लाख कोटी रूपयांच्या आर्थिक पॅकेजनंतर नॉन बँकिंग फायनान्स कंपनींना देखील एखादं पॅकेज आज जाहीर होऊ शकते.

कोरोनाच्या या कठीण काळात आरबीआय गव्हर्नर दास यांची ही तिसरी पत्रकार परिषद आहे. या अगोदर त्यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यात पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये कर्जाचं जे प्रेशर आहे ते कमी करण्याचा आणि अर्थव्यवस्थेला आधार देण्याचा केलेला होता.

ज्यामध्ये 75 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. तसंच बँकासाठी 5 लाख कोटी रूपयांचे पॅकेज जाहीर केले होते. तसंच कर्जदारांना देखील दिलासा दिलेला होता. 1 मार्च ते 31 मे पर्यंत हा दिलासा मिळालेला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

डोमकावळ्यांची फडफड औटघटकेची ठरेल; संजय राऊतांची अग्रलेखातून सडकून टीका

पाहा, आज पुण्यात किती रूग्ण वाढले अन् किती रूग्णांना डिस्चार्ज मिळाला…

महत्वाच्या बातम्या-

“ज्यांना सत्तेच्या अंगणातून हाकलून दिलंय ते आंदोलन करतायेत, मेरा आंगण मेरा रणांगण”

राज्यपालांच्या अंगणात लोळण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या घरात येऊन चर्चा करा- संजय राऊत

आनंदाची बातमी… पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी, पुणेकरांना दिलासा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या