बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करणं सरकारच्याच हातात- शक्तिकांत दास

मुंबई | देशात पेट्रोल-डिझेलचे सातत्याने वाढणारे दर हा चिंतेचा मुद्दा बनला आहे. आता भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याच मुद्द्यावर मत व्यकत केलं आहे. देशातील पेट्रोल डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतीवर नियंत्रण आणणं हे केंद्र आणि राज्य सरकारच्याच हातात आहे, असं मत दास यांनी व्यक्त केलं आहे.

पतधोरण जाहिर करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत बोलताना दास म्हणाले, इंधनावर सरकारने लादलेला कर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे  पेट्रोल, डिझेलच्या किमंती वाढल्या आहेत. सरकारने इंधनावरील दर कमी केल्यास पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करणं हे सरकारच्याच हातात आहे, असं मत दास यांनी व्यक्त केलंय.

याशिवाय कोरोना कमी झाल्याने अर्थव्यवस्था रुळावर आली आहे. त्यामुळे याआधी देण्यात आलेले पॅकेजस देखील बंद करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व बँकेने घेतला असल्याचं दास यांनी सांगितलं. मात्र असं केल्याने अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही, असंही ते म्हणालेत.

या आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थाच्या वाढीचा दर बँकेने 9.5 टक्क्यावर कायम ठेवला आहे. किरकोळ विक्री मूल्यावरील आधारीत चलनवाढीचा दर कमी होण्याची अपेक्षा असून चालू आर्थिक वर्षामध्ये तो दर 5.3 टक्के वर असण्याचा अंदाज आहे. याआधी तो  दर 5.7 टक्के होता.

थोडक्यात बातम्या –

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज पहिल्यांदाच आली समोर, पाहा व्हिडीओ

‘जे कोरोना लस घेतील त्यांना फ्रीमध्ये…’; पॉर्नस्टारने दिलेल्या ऑफरने खळबळ

काँग्रेसची दुखणी साध्या उपायांनी बरी होणार नाहीत- प्रशांत किशोर

अखेरचा चेंडू अन् 6 धावा; श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात विराटच्या शिलेदाराचा चमत्कार, पाहा व्हिडीओ

“दोषींवर कारवाई होईपर्यंत मी जागेवरून हालणार नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More