बँक लॉकर वापरताय? मग RBI चे ‘हे’ नियम नक्की वाचा

RBI Guidelines for Bank Lockers

RBI Guidelines for Bank Lockers | आपल्या घरातील मौल्यवान (Valuable) चीजवस्तू ठेवण्यासाठी आपल्याकडे एखादे लॉकर (Locker) असते, पण दागिने (Jewelry), इतर मौल्यवान वस्तू बहुतांश मध्यमवर्गीय नागरिक (Middle Class Citizens) बँकेच्या सेफ्टी व्हॉल्टमध्ये (Safety Vault) म्हणजेच सुरक्षित लॉकरमध्ये ठेवण्यास प्राधान्य (Preference) देतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India – RBI) बँकेच्या लॉकरसंबंधी नियमावली (Guidelines) कधीच प्रसिद्ध केली आहे. पण डिसेंबर 2024 मध्ये लखनौमध्ये (Lucknow) बँकेवर दरोडा (Robbery) टाकून चोरांनी (Thieves) 42 लॉकर फोडली होती. त्यानंतर आरबीआयच्या नियमावलीबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. (RBI Guidelines for Bank Lockers)

बँक लॉकरचा वापर कसा करावा?

बँकेचे खातेदार (Account Holder) बँकेतील लॉकर भाडेतत्त्वावर (Rent) घेऊ शकतात आणि त्यामध्ये मौल्यवान वस्तू ठेवू शकतात. या लॉकरमध्ये कुठल्या वस्तू ठेवायला परवानगी आहे आणि काही अप्रिय घटना घडल्यास बँक नुकसान भरपाई कशा पद्धतीने देईल याबाबत आरबीआयने नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे.

बँकेच्या लॉकरमध्ये ‘या’ वस्तू ठेवू नका:

कुठल्याही बँकेतील लॉकरमध्ये रोख रक्कम (Cash) ठेवायला परवानगी नाही. त्यामुळे ग्राहकांनी (Customers) तसे करू नये, असे आवाहन आरबीआयच्या वतीने करण्यात आले आहे. रोख पैसे, कोणतेही हत्यार (Weapon), औषधे (Drugs)/ अमली पदार्थ (Narcotics), विष (Poison), स्फोटके (Explosives), भाज्या/फळांसारखे कुजणारे पदार्थ (Perishable Items), किरणोत्सर्गी साहित्य (Radioactive Material), बेकायदेशीर साहित्य (Illegal Items), दुसऱ्या व्यक्तीसाठी अडचणीचे ठरेल असे साहित्य हे सगळे बँक लॉकरमध्ये ठेवण्यास आरबीआयच्या नियमावलीनुसार परवानगी नाही. (RBI Guidelines for Bank Lockers)

बँकेच्या लॉकरमध्ये ‘या’ वस्तू ठेवू शकता:

आरबीआयने जशी बँक लॉकरमध्ये ठेवता न येणाऱ्या वस्तूंची यादी प्रसिद्ध केली आहे, तशीच कोणत्या वस्तू ठेवता येतील याचीही यादी जाहीर केली आहे. मौल्यवान दागिने, संपत्तीची कागदपत्रे (Property Documents), जन्म-मृत्यू दाखले (Birth-Death Certificates), महत्त्वाची कागदपत्रे, लग्नाचे प्रमाणपत्र (Marriage Certificate), इन्शुरन्स पॉलिसीची (Insurance Policy) कागदपत्रे, सेव्हिंग्ज बाँड (Savings Bond), किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) या वस्तू आणि कागदपत्रे तुम्ही बँक लॉकरमध्ये सुरक्षित ठेवू शकता.

नुकसान भरपाईचे नियम

आरबीआयच्या नियमांनुसार, बँकेच्या बेजबाबदारपणामुळे (Negligence) ग्राहकाची वस्तू गहाळ (Missing) झाली किंवा चोरीला (Theft) गेली तर बँकेने घेतलेल्या लॉकरच्या भाड्याच्या 100 पट रक्कम नुकसान भरपाई म्हणून देता येईल. लॉकरमधील दागिन्यांच्या किमतीइतकी भरपाई बँक देणार नाही. म्हणजेच, जर तुम्ही बँकेला वर्षाला लॉकर भाडे 4000 रुपये देत असाल आणि वस्तू गहाळ किंवा चोरी झाल्यास तुम्हाला 100 पट म्हणजे चार लाख रुपये नुकसान भरपाई बँक देते. लॉकरमधील दागिन्यांची किंमत मिळत नाही. त्यामुळे लॉकरमध्ये ठेवलेली कागदपत्रे, बाँड्स, दागिने यांची एकूण किंमत चार लाखांपेक्षा कमी असेल तर तुमचे नुकसान होणार नाही. (RBI Guidelines for Bank Lockers)

लखनौमध्ये डिसेंबर 2024 मध्ये बँक लॉकरवर पडलेल्या दरोड्यामुळे बँक लॉकरसंबंधी नियमांबद्दल जागरूकता (Awareness) निर्माण झाली आहे. आरबीआयने 18 ऑगस्ट 2019 ला एक कायदा (Act) लागू केला होता, त्यानुसार, बँक लॉकरमधून रोख रक्कम चोरीला गेल्यास त्याची नुकसान भरपाई बँक देणार नाही कारण आरबीआय नियमांनुसार लॉकरमध्ये रोख रक्कम ठेवण्यास परवानगीच नाही.

Title : RBI Guidelines for Bank Lockers  

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .