बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

RBI ने लागू केले ‘हे’ नवीन नियम; 1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंटमध्ये होणार हा मोठा बदल

नवी दिल्ली | आरबीआयने बँकिंग फसवणूक आणि ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेत नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीममध्ये मोठा बदल होणार आहे. हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.

नियमानुसार फोन-पे, पेटीएम तसेच बँका आणि डिजिटल पेमेंट प्लॅफाॅर्मला प्रत्येकवेळी हफ्ता तसेच बिलाचे पैसे कापण्यापुर्वी परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच एकदा परवानगी घेतल्यानंतर प्रत्येकवेळी पैसे आपोआप कट होऊ नये, यासाठी त्यांना त्यंच्या व्यवस्थेत मोठा बदल करावा लागणार आहे.

ऑटो डेबिट पमेंट सिस्टीममध्ये वीज, गॅस, एलआयसी असे अनेक खर्च ठेवले असतील तर ते एका विशिष्ट तारखेला आपोआप कट होतील. तसेच जर ऑटो डेबिट लागू झालं तर पैसे कट होण्याच्या 5 दिवस आधी ग्राहकाच्या मोबाईलवर आदी सूचना जातील.

दरम्यान, हा मोड सुरु करण्यासाठी ग्राहकाला त्याचा सक्रीय मोबाईल क्रमांक बँकमध्ये जाऊन अपडेट करावा लागेल. या मोडनंतर पेमेंटच्या 24 तास आधी देखील रिमाईंडर मेसेज करण्यात येईल.

थोडक्यात बातम्या- 

‘…अन् महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा कॅप्टन झाला’; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

“…त्यामुळे आता संजय राऊतांनी राजकारण सोडावं”

पंजाबने हातातला सामना गमावला, राजस्थानचा रोमांचक विजय

कोरोना संदर्भात देशासाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर!

भारतात दिल्या जाणाऱ्या ‘या’ लसीला ब्रिटनकडून मान्यता नाहीच!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More