RBI MPC Meeting | देशातील सर्वोच्च बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने आपले नवे पतधोरण जाहीर केलं आहे. आज 8 ऑगस्ट रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरबीआयने रेपो रेट संदर्भात निर्णय घेतला. त्यानुसार, रेपो रेटमध्ये (RBI MPC Meeting ) कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत माहिती दिली आहे.आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केले नसल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे. चलनविषक धोरण समितीच्या सहापैकी चार सदस्यांनी रेपो रेटमध्ये कोणताही बदल करू नये, असे सुचविले.
याचबरोबर आरबीआयने SDF 6.25%, MSF 6.75% तसेच रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी शक्तिकांत दास यांनी रेपो रेटच्या दरावर भाष्य केलं होतं. भारतासह सध्या संपूर्ण जगात आर्थिक पातळीवर अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत व्याजदराच्या कपातीबाबत सध्याच (RBI MPC Meeting ) चर्चा करणे योग्य नाही, असं शक्तिकांत दास म्हणाले होते.
रेपो रेट जैसे थे
दरम्यान, आज झालेल्या बैठकीत रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयने सलग आठव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाहीये. प्रती दोन महिन्यांनी आयोजित केली जाणारी चलनविषक धोरण ठरवणारी ही तिसरी बैठक होती.
कर्जदारांना दिलासा मिळणार?
या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, तुमच्या गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच अन्य प्रकारच्या कर्जाच्या हप्यांत कोणतीही वाढ होणार नाही किंवा घटही होणार नाहीये. यावेळी आरबीआयने रेपो रेट जैसे थे (RBI MPC Meeting ) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेपो रेट म्हणजे म्हणजे काय?
आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. हा रेपो रेट म्हणजेच बँकांना दिला जाणारा कर्जाचा दर होय. जेव्हा हा दर म्हणजेच बँकांना व्याज देण्याचा दर कमी होतो तेव्हा कर्ज स्वस्त होते. याचा थेट परिणाम हा होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोनवर होत असतो. या कर्जाच्या किंमतीमुळे ईएमआयच्या किमतीही वाढतात. (RBI MPC Meeting )
News Title : RBI MPC Meeting 2024 Repo rate unchanged
महत्त्वाच्या बातम्या-
विनेश फोगाटला भारतरत्न आणि खासदारकी मिळणार? ‘या’ पक्षाने केली मागणी
या दोन राशींची होणार चांदी; गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ 2 राशींना मिळणार पैसाच पैसा
क्रिकेट विश्वातून खळबळजनक बातमी, युवा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी
‘काल ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी खेळण्याआधी…’; बजरंग पुनियाची पोस्ट चर्चेत
आनंदाची बातमी! लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार