RBI New Rule | जर तुम्ही बँकिंगच्या नावाखाली होणारी फसवणूक (Fraud) आणि प्रमोशनल कॉल्समुळे (Promotional Calls) त्रस्त असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अलीकडच्या काळात फ्रॉड कॉल्सची समस्या खूपच वाढली आहे. तुम्ही देखील अनेकदा ऐकले असेल की एखाद्या व्यक्तीची बँकेच्या नावाने फसवणूक झाली. अशा परिस्थितीत, तुमच्या या समस्येवर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India – RBI) पूर्णविराम लावला आहे. होय, बँकिंग कॉल्ससाठी RBI ने (Numbers) एक मोठा निर्णय घेतला आहे. (RBI New Rule)
या बातमीच्या माध्यमातून आपण आरबीआयच्या या नवीन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हा निर्णय कसा लागू होईल, त्याचा ग्राहकांना (Customers) काय फायदा होईल आणि फसवणुकीला आळा घालण्यासाठी हा निर्णय कसा प्रभावी ठरेल याबद्दल जाणून घेणार आहोत.
फक्त ‘या’ दोन नंबर सीरीजचा वापर
आरबीआयने वित्तीय संस्थांसाठी (Financial Institutions) आपल्या ग्राहकांना व्यवहार (Transactions) आणि मार्केटिंग कॉल्स (Marketing Calls) करण्यासाठी फक्त दोन डेडिकेटेड फोन नंबर सीरीज (Dedicated Phone Number Series) सुरू केल्या आहेत. म्हणजेच रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या याच दोन सीरीजमधून ग्राहकांना बँकिंग कॉल्स येतील. आरबीआयच्या या निर्णयामुळे मोबाईल (Mobile) वापरकर्त्यांना फसवणुकीपासून दिलासा मिळेल.
आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, बँकांना आता सर्व व्यवहारांशी संबंधित कॉल्ससाठी फक्त 1600 ने सुरू होणाऱ्या फोन नंबरचाच वापर करावा लागेल. तुम्ही एखादा व्यवहार केला असेल आणि तुम्हाला या व्यवहारासाठी बँकेकडून कॉल येणार असेल तर तो फक्त 1600 सीरीजने सुरू होणाऱ्या नंबरवरूनच येईल. अशा परिस्थितीत ग्राहकांना या सीरीजचा नंबर बँकिंगसाठीच आहे याची खात्री होईल. यामुळे फसवणुकीसारख्या प्रकरणांमध्ये घट होण्याची शक्यता आहे. (RBI New Rule)
मार्केटिंगसाठी वेगळी सीरीज
दुसरीकडे, मार्केटिंग एसएमएस (Marketing SMS) द्वारे माहिती देण्यासाठी बँकांना फक्त 140 ने सुरू होणाऱ्या नंबरचाच वापर करावा लागेल. आरबीआयने हे नंबर बँकिंग मार्केटिंग आणि एसएमएससाठी निश्चित केले आहेत. 140 सीरीजने सुरू होणाऱ्या नंबरवरून तुम्हाला वैयक्तिक कर्ज (Personal Loan), क्रेडिट कार्ड (Credit Card) किंवा विमा (Insurance) सारख्या सेवांसाठी (Services) कॉल येऊ शकतात.
हा निर्णय ग्राहकांना अशा भामट्यांपासून (Fraudsters) वाचवण्यासाठी मदत करेल जे बँकांच्या नावाने कर्ज, क्रेडिट कार्ड देण्याचे खोटे दावे करतात. हे भामटे अनेकदा बँकेचे एजंट (Agent) असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक करतात आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळतात. आरबीआयच्या या नवीन नियमांमुळे अशा फसवणुकीला आळा बसेल आणि ग्राहकांची फसवणूक होण्यापासून बचाव होईल अशी अपेक्षा आहे. (RBI New Rule)
Title : RBI New Rule for Banking Calls to Prevent Fraud