RBI Repo Rate l तुम्हीही बऱ्याच दिवसांपासून होम लोनचा EMI कमी होण्याची वाट पाहत असाल तर RBI ने तुमची पुन्हा एकदा निराशा केली आहे. कारण RBI ने सलग दहाव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केला नाही. मध्यवर्ती बँकेने रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवला आहे. आरबीआय प्रमुख शक्तिकांत दास यांनी एमपीसीमध्ये घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे.
RBI ने रेपो दरात बदल केला नाही :
RBI ने रेपो दरात बदल न करण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर स्वस्तात गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा कार लोनच्या प्रतीक्षेत असलेल्यांना पुन्हा धक्का बसला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला, फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर व्याजदर कमी करण्यासाठी आरबीआयवर दबावही वाढला होता. तसेच डिसेंबरमध्ये होणाऱ्या एमपीसीमध्ये व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
सेंट्रल बँकेद्वारे दरवर्षी 6 वेळा चलनविषयक धोरण बैठक घेतली जाते. 2024-25 या आर्थिक वर्षातील एमपीसीची ही तिसरी बैठक आहे. या बैठकीत महागाईचा दर लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेकडून रेपो दराचा आढावा घेतला जातो. यावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आरबीआय मागणी, पुरवठा, महागाई आणि पत यांसारख्या अनेक बाबी लक्षात ठेवते.
RBI Repo Rate l नेमका काय परिणाम होतो? :
आरबीआयने रेपो दरात कपात किंवा वाढ केल्यास बँकांनी दिलेल्या कर्जाच्या व्याजदरावर परिणाम होतो. रेपो रेट वाढल्यानंतर गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जासह सर्व प्रकारची कर्जे बँकांनी महाग केली आहेत. सोप्या शब्दात बँका व्याजदर वाढवतात. पण जर आरबीआयने रेपो दरात कपात केली तर कर्जाचा व्याजदर कमी होतो.
याशिवाय RBI कडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट वाढल्याने बँकांना आरबीआयकडून महागड्या दराने कर्ज मिळेल. यामुळे गृह कर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज इत्यादीवरील व्याजदर वाढतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होईल.
News Title : RBI Repo Rate 2024
महत्वाच्या बातम्या –
आज रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका सामना! टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार?
दसऱ्याच्या आधीच सोनं झालं स्वस्त?, काय आहेत सध्या 10 ग्रॅमचे भाव?
“महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार”; देवेंद्र फडणविसांचा विश्वास
आमदार बनलेल्या विनेश फोगाटची एकूण संपत्ती किती?, समोर आला आकडा
आज नवरात्रीचा सातवा दिवस, देवी कालरात्री ‘या’ राशींना देणार सुख समृद्धी!