वर्षाच्या शेवटी RBI चा सर्वसामान्यांना सर्वात मोठा धक्का!

RBI Repo Rate | देशातील सर्वोच्च बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वर्षाच्या शेवटी ग्राहकांना मोठा धक्का दिलाय. आरबीआयने रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. ग्राहकांना वाढीव गृहकर्जाचा हप्ता भरावा लागणार आहे. गेल्या 10 वेळा रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही ग्राहकांच्या पदरी निराशाच पडली आहे. सध्या रेपो दर 6.50 टक्के इतका आहे. (RBI Repo Rate)

रेपो दरात कोणताही बदल न करण्याची ही 11वी वेळ आहे. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात शेवटचा बदल केला आणि तो 25 बेसिस पॉइंट्सने वाढवून 6.50 टक्के करण्यात आला होता. तेव्हापासून त्यात बदल करण्यात आलेला नाही.

रेपो रेटमध्ये बदल नाहीच

4 ते 6 डिसेंबर अशी पतधोरण समितीची बैठक जैसलमेर येथे झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज (6 डिसेंबर) त्यांच्या कार्यकाळातील शेवटचे आर्थिक धोरण जाहीर केले. आज सकाळी 10 वाजता रेपो दराची घोषणा झाली. यात दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय 4 विरुद्ध 2 या मताने घेतला गेल्याची माहिती शक्तीकांत दास यांनी दिली.

या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, तुमच्या गृहकर्ज, वाहनकर्ज तसेच अन्य प्रकारच्या कर्जाच्या हप्यांत कोणतीही वाढ होणार नाही किंवा घटही होणार नाहीये. यावेळी आरबीआयने रेपो रेट जैसे थे (RBI Repo Rate) ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रेपो रेट म्हणजे म्हणजे काय?

आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. हा रेपो रेट म्हणजेच बँकांना दिला जाणारा कर्जाचा दर होय. जेव्हा हा दर म्हणजेच बँकांना व्याज देण्याचा दर कमी होतो तेव्हा कर्ज स्वस्त होते. याचा थेट परिणाम हा होम लोन, ऑटो लोन, पर्सनल लोनवर होत असतो. या कर्जाच्या किंमतीमुळे ईएमआयच्या किमतीही वाढतात. (RBI Repo Rate)

News Title : RBI Repo Rate unchanged 2024 December

महत्त्वाच्या बातम्या-

फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी?, मोठी अपडेट समोर

शपथविधी होताच वाहनचालकांना दिलासा, राज्यात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त?

लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय

आज धनवृद्धीचे योग तर ‘या’ राशींना मिळेल प्रेमाची साथ!

मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेणार?, अमृता फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं