बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिझर्व्ह बँकेचा राजकारण्यांना झटका; घेतला हा मोठा निर्णय

नवी दिल्ली | भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सहकारी आणि नागरी बँकांतील घोटाळ्यांना चाप बसण्यास मदत होणार आहे.  आमदार, खासदार आणि नगरसेवकांना नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालक होण्यास मनाई करण्यात आली आहे.

नागरी सहकारी बँकांवरील व्यवस्थापकीय संचालक तसेच पूर्ण वेळ संचालकपदावरील व्यक्ती शैक्षणिकदृष्टय़ा अर्हताप्राप्त असावी, असाही दंडक करण्यात आला आहे. महानगरपालिकांचे वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य – राजकारण्यांनाही या पदावर राहता येणार नाही.

नागरी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरील व्यक्ती ही 35 वर्षांपेक्षा कमी व 70 वर्षांपेक्षा अधिक वयाची नसावी. तसेच या पदावर एकाच व्यक्तीने 15 वर्षांपेक्षा अधिक काळ राहू नये. तसेच एकाच व्यक्तीकडे हे पद सलग तीन अथवा पाच वर्षांपर्यंत ठेवण्यास मुभा आहे, असं रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे.

सदर पदावरील व्यक्ती ही स्नातकोत्तर पदवीधारक, वित्तीय विषयातील, सनदी वा व्यय लेखापाल किंवा आर्थिक विषयातील व्यवस्थापन पदवीधारक, बँक अथवा सहकारी व्यवसाय व्यवस्थापनातील पदविकाधारक असावी, असा दंडक घालून देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?- प्रविण दरेकर

“30 विषाणूंपासून भविष्यात मानवाला धोका, त्यांच्यापासून मोठी साथ पसरू शकते”

“ओबीसींच्या आरक्षणासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम आहे का?”

आज पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’; सकाळी 11 वाजता देशाला संबोधित करणार

‘दोन्ही डोस घेतलेत म्हणून निर्धास्त राहू नका, कारण…’; डेल्टा व्हेरिएंटबाबत WHO ने दिली महत्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More