बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बँकेची कामं आटोपून घ्या! पुढील महिन्यात बँका 17 दिवस बंद

नवी दिल्ली | देशभरात मोठ्या प्रमाणात दिवाळी सण साजरा केला जात असतो. तो दिवाळीचा सण येत्या नोव्हेंबर महिन्यात येत आहे. त्यावेळी बाजारपेठेत वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. अशातच आता भारतीय रिझर्व्ह बॅंकेने आपल्या बॅंकांच्या सुट्यांची यादी जाहीर केली आहे. नोव्हेंबर महिन्यात तब्बल 17 दिवस बॅंका बंद राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी वेळीच सावध होऊन बॅंकेतील कामे आटपून घेणे आवश्यक आहे.

आरबीआयने 1,3, 4, 5,6,10,11,12,19,22, आणि 23 नोव्हेंबर रोजी बॅंकांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यावेळी बॅंका बंद राहणार आहेत. तर 7,14,21 आणि 28 रोजी रविवार येत असल्याने त्यादिवशी बॅंका बंदच असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बॅंकेतील कामे अगोदर उरकून घेतल्यामुळे पुढील काही दिवसात गडबड होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

दिवाळी पुजेच्या निमित्ताने 4 नोव्हेंबर रोजी बंगळुरु शहर वगळता सर्व राज्यात बॅंका बंद राहणार आहेत. अहमदाबाद, बंगळुरु, जयपूर, नागपूर,गंगटोक,बेलापूर, लखनऊ, मुंबई या शहरात 5 नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदेच्या सणामुळे बॅंका बंद राहणार आहेत. 6 नोव्हेंबर रोजी भाऊबिज, चित्रगुप्त जयंती, निंगोल चकोबा असल्यामुळे गंगटोक, इंफाळ, नागपूर, लखनऊ आणि शिमला या शहरात बॅंका बंद राहणार आहेत.

दरम्यान, 11 नोव्हेंबरला पाटणा आणि रांची शहरात छठ पुजानिमित्त तर 12 नोव्हेंबरला वंगला उत्सवानिमित्ताने शिलांगमध्ये बॅंका बंद राहतील. 19 नोव्हेंबरला गुरूनानक जयंतीला बंगळुरूमध्ये तर 22 नोव्हेंबरला कनकदास जयंतीच्या निमित्ताने शिलाॅंग शहरात बॅंका बंद राहणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

“नवाब मलिकांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार, त्यांच्या सांगण्यावरूनच…”

शमीला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांविरोधात फेसबूकची मोठी कारवाई

“आमच्या जीवाला धोका, जाळून टाकू, मारून टाकू, लटकवून टाकू अशा धमक्या येत आहेत”

शिवसेनेला मोठा धक्का! ‘हा’ बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

दिवाळीआधी खूशखबर! सोन्याच्या दरात पुन्हा घट; वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More