बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशावर कोरोनाचं संकट; आरबीआयने केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली | कोरोनाचं संकट देशाच्या डोक्यावर घोंगावत आहे. या संकटातून बाहेर येण्यासाठी आरबीआयनं मोठ्या निधीची घोषण केली आहे. आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी आरबीआय 50,000 कोटी देणार आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. आरबीआय कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेत चांगली वाढ झाल्याचंही ते म्हणाले.

जगाच्या तुलनेत भारतात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जास्त आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम लक्षात घेता चांगली उपाययोजना करणं आवश्यक आहे. कोरोना संबंधित उदयोन्मुख परिस्थितीवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून आहे, असंही शक्तिकांत दास यांनी सांगितलं आहे.

शक्तिकांत दास यांनी आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 50,000 कोटी रुपये दिले आहेत. याद्वारे बँका लस उत्पादक, लस वाहतूक, निर्यातदारांना सोप्या हप्त्यांमध्ये कर्ज उपलब्ध करून देतील. याशिवाय रुग्णालये, आरोग्य सेवा पुरवठा करणाऱ्यांनाही हा लाभ मिळणार आहे. प्राधान्य क्षेत्रासाठी लवकरच कर्ज आणि प्रोत्साहन दिले जाईल. फार्माच्या पायाभूत सुविधांसाठी आरबीआयने मोठी घोषणा केली आहे. राज्यांना ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यात येणार आहे. ओव्हरड्राफ्टमध्ये राज्यांना सवलत मिळेल.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला धोका असल्याचंही सांगितलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आणण्यासाठी कित्येक राज्यात लॉकडाऊन आणि इतर कडक निर्बंध घातले आहेत, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला हानी पोहोचण्याची शक्यता आहे, असं ते म्हणाले.

थोडक्यात बातम्या

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हे सरकारचं अपयश, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”

“राजेश टोपे जालन्याचे आरोग्यमंत्री आहेत की महाराष्ट्राचे?”

माझ्यासाठी आणि समाजासाठी अतिशय दुर्दैवी आणि अतिशय भयानक क्षण- विनोद पाटील

“सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारलं, त्याची भरपाई राज्य सरकार करुन देणार”

…म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला- अशोक चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More