बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

RCBचं जेतेपदाचं स्वप्न यंदाही भंगलं; हैद्राबादची बंगळूरूवर 6 गडी राखत मात

दुबई | यंदाच्या वर्षी रॉयल चॅलेंजर बंगळूरूचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न हैद्राहादच्या केन विलियम्सन आणि जेसन होल्डरने धुळीस मिळवलंय. अखेरपर्यंत सुरु असलेल्या थरारक सामन्यात हैद्राबादने बंगळूरूवर विजय मिळवलाय.

डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 6 विकेट्स राखून मात केलीये. या पराभवासह रॉयल चॅलेंजर बंगळूरूचं या स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलंय.

टॉस जिंकत प्रथम हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळूरूकडून केवळ एबी डिव्हिलियर्सने चांगला खेळ करत टीमला 131 रन्सपर्यंत पोहोचवलं.

132 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैद्राबादची सुरुवात खराब झाली. वॉर्नर, गोस्वामी, पांडे आणि गर्ग यांना साजेसा खेळ करता आला नाही. मात्र चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी उतरलेल्या केन विलियम्सनने अर्धशतकाच्या जौरावर हैद्राबादला विजयाच्या पथावर आणलं. जेसन होल्डरने विलियम्सनला उत्तम साथ दिली.

महत्वाच्या बातम्या-

दहावी-बारावीचे वर्ग ‘या’ तारखेपासून सुरु करण्याचा विचार; वर्षा गायकवाड

स्वत:ला अटक करणार का?;निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

“शेतकऱ्याला दिलेली मदत म्हणजे कोपराला गूळ लावायचा व हाताला चाटायचा”

नितीशकुमार यांनी दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाले…

पुण्यात महाविकास आघाडीला सर्वात मोठं यश; भाजपला मोठा धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More