RCB vs CSK l आयपीएच्या प्लेऑफसाठी 3 संघ निश्चित झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादनेही आपले स्थान निश्चित केले आहे. आता फक्त चौथा संघ निश्चित व्हायचा असून, त्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज चुरशीचा सामना होणार आहे. हा ब्लॉकबस्टर सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज 18 मे रोजी होणार आहे, ज्यामध्ये भारतीय क्रिकेटचे दोन मोठे सुपरस्टार विराट कोहली आणि एमएस धोनी आमनेसामने येणार आहेत.
RCB vs CSK l जर पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होणार? :
बेंगळुरू येथे होणाऱ्या या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. एका बाजूला बेंगळुरूचा संघ आहे, ज्याने 8 सामन्यांत 7 पराभवानंतर सलग 5 सामने जिंकून जोरदार पुनरागमन केले आणि प्लेऑफच्या शर्यतीत प्रवेश केला. तर दुसरीकडे, चेन्नईचा संघ आहे, ज्याने नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली चढ-उतार असतानाही या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे.
हा सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाणार आहे. हवामान खात्यानुसार, आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता होती. या हंगामातील काही सामन्यांवर पावसाचा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सामना रद्द करावा लागला आहे. परंतु या सामन्यात पावसाची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे.
सर्वोत्तम फलंदाजांमध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर :
बंगळुरू आणि चेन्नई यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यास त्याचा फायदा थेट CSK ला होणार आहे. जर सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळणार आहेत. चेन्नईचे सध्या 14 गुण आहेत. जर सामना रद्द झाला तर CSK ला 1 गुण मिळताच CSK चे 15 गुण होतील आणि तो प्लेऑफसाठी पात्र होईल. तर आरसीबीचे सध्या केवळ 12 गुण आहेत.
आरसीबीकडे अनेक दिग्गज खेळाडू आहेत. या मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत संघाचा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. कोहलीने 13 सामन्यात 661 धावा केल्या आहेत. या हंगामात त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतके केली आहेत. फाफ डु प्लेसिसने 13 सामन्यात 367 धावा केल्या आहेत.
News Title : RCB vs CSK IPL 2024
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; यलो अलर्ट जारी
मोठ्या उसळीनंतर सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर
भाजपच्या ‘या’ उमेदवारानी पैसे वाटले? ठाकरे गटाचा आरोप; फडणवीस थेट…
उद्धव ठाकरेंचा संबंध “भगव्याशी नाही तर फक्त हिरव्याशी”…’या’ बड्या नेत्याचा हल्लाबोल
गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा संभवतो; या राशीच्या व्यक्तींनी करावी गुंतवणूक