चेन्नईला नमवत RCB प्लेऑफमध्ये; विराटला अश्रु अनावर, Video व्हायरल

RCB vs CSK | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेला सामना प्रेक्षकांच्या कायमच स्मरणात राहील. अगदी शेवटच्या बॉलपर्यंत दोन्ही संघांमध्ये धाकधूक होती. अखेर बंगळुरू संघाने अष्टपैलू कामगिरी करत चेन्नईचा पराभव केला आणि प्लेऑफमध्ये धडक मारली.

चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होचा. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने 218 धावा केल्या होत्या. 219 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला 20 षटकांत केवळ 191 धावा करता आल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्ससवर रनरेटनुसार विजय मिळवत प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली.

आरसीबीच्या विजयानंतर विराट कोहली भावूक

या विजयानंतर आरसीबीच्या विराट कोहलीला अश्रु अनावर झाले. विराट भावुक झाल्याचं मैदानात दिसून आलं. तर, विराटला आणि आरसीबीला सपोर्ट करण्यासाठी आलेली अनुष्का शर्मा देखील यावेळी आनंदी दिसून आली. दोघांचा व्हिडिओ आता तूफान व्हायरल झाला आहे.

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबी आणि चेन्नई या दोन्ही संघांचा हा या हंगामातील अखेरचा आणि करो या मरो असा सामना होता. चेन्नईला प्लेऑफमध्ये (RCB vs CSK) पोहचण्यासाठी हा सामना केवळ जिंकायचा होता. मात्र आरसीबीला प्लेऑफच्या तिकीटासाठी हा सामना 18 धावांच्या फरकाने जिंकायचा होता.

आरसीबीसाठी यश दयाल हा हीरो ठरला.त्याला अखेरचं षटक टाकण्याची संधी मिळाली. यश दयालने दुसऱ्याच बॉलवर धोनीला कॅच आऊट केलं आणि आरसीबीचा विजय निश्चित केला.यशने यशस्वीपणे अखेरच्या ओव्हरमध्ये 17 धावांचा बचाव करताना फक्त 7 धावा दिल्या. चेन्नईकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक नाबाद 42 धावांची खेळी केली तर आरसीबीकडून कर्णधार फाफ ड्यू प्लेसीसने सर्वाधिक 54 धावा केल्या.

‘हे’ संघ प्ले ऑफसाठी पात्र-

कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे चार संघ प्ले ऑफच्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. कालच्या विजयामुळे आरसीबीला महत्वाचं प्ले ऑफमध्ये स्थान मिळालं आहे.

News Title- RCB vs CSK Virat Kohli Emotional After victory

महत्वाच्या बातम्या-

‘या’ राशीच्या व्यक्तींना व्यवसायातून मोठा धनलाभ होईल!

रणवीरने दीपिकाला ठेवलं नवीन नाव, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

चाळीशी पार झाली तरी केलं नाही लग्न?; मुक्ता बर्वे स्पष्टच बोलली

‘राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होणार’, बड्या नेत्याचा मोठा दावा

“ऑडिशन चांगलं झालं, पण नंतर कॉम्प्रमाईजसाठी..”; शर्मिष्ठा राऊतने सांगितला वाईट अनुभव