बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आयपीलमध्ये RCB दिसणार ‘या’ नव्या जर्सीत; कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!

मुंबई | कोरोनाची दुसरी लाट येत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही आहे. कोरोनाचे संकट पाहता मे महिन्यातील आयपीएलचे सामने रद्द करण्यात आले होते. त्यानंतर अनेक खेळाडूंनी आयपीएलमधून माघार देखील घेतली. अशातच आता 2021 मधील आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचा थरार 19 सप्टेंबर पासून युएईमध्ये रंगणार आहे. टाॅप तीनमध्ये असला आरसीबी संघ सध्या जोरदार फॉममध्ये आहे. अशातच आता आरसीबीची नवी जर्सी चर्चेचा विषय ठरत आहे.

आरसीबीचे खेळाडू आयपीएलच्या या हंगामामध्ये धमाकेदार कामगिरी करत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघ आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीचा संघ नेहमी लाल रंगाच्या जर्सीत खेळत असतो. मात्र या वेळी तो संघ निळ्या रंगाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. याच खास कारण आरसीबीने ट्विट करत सांगितलं आहे.

कोरोना काळाच्या संकटात पीपीई किट घालून अनेक नागरिकांनी देशसेवा केली आहे. जो रंग पीपीई किटच्या संबंधित आहे. त्या निळ्या जर्सीत आरसीबी पहिला सामना खेळेल. देशातील फ्रंटलाईन वर्कर्सना पाठिंबा म्हणून या रंगाची जर्सी घालणार आहेत. त्यासंदर्भात आरसीबीने सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहलीसह अनेक खेळाडू या बद्दल माहिती देताना दिसत आहे.

दरम्यान, आयपीएलच्या दुसऱ्या पर्वात आरसीबीचा पहिला सामना कोलकत्ता नाईट रायडर्स या संघाविरूद्ध आहे. 20 सप्टेंबर होणाऱ्या या सामन्यात आरसीबी निळ्या रंगाच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. त्यानंतर आरसीबीचा सामना चेन्नई सुपरकिंग्ससोबत शारजाह मैदानावर 24 सप्टेंबर रोजी होणार आहे. यआधीही आरसीबी लाल ऐवजी हिरव्या जर्सीत खेळ आली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

‘त्यांच्या मनात अश्लिल अर्थ नव्हता’; चंद्रकांत पाटलांकडून दरेकरांची पाठराखण

‘…तर मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं’; अण्णा हजारेंचा इशारा

मालेगावचे एमआयएमचे आमदार म्हणतात; “माझ्या जीवाला धोका आहे”

जगाने जरी स्वातंत्र्य दिलं तरीही महिलांना बुरखा घालून….; तालिबान्यांच्या त्या निर्णयावरून यु-टर्न

“इच्छुकांनो हे लक्षात ठेवा”; मनसेच्या वसंत मोरेंनी सांगितली मोठी गंमत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More