तंत्रज्ञान

अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा दिवाळखोरीचा प्रस्ताव

मुंबई | अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडनं कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचं जाहीर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. मालमत्ता विकून कर्जाची परतफेड करण्यात अपयश आल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतला आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्स वर 46 हजार कोटी रुपयांच कर्ज आहे मात्र त्यांना कंपनीची मालमत्ता विकून परत करण्यात अपयश आलं आहे.

कर्जाची रक्कम परत देता यावी यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामार्फत कर्ज परतफेड योजना तयार करण्याचा निर्णय रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

दरम्यान, मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सचे स्पेक्ट्रम विकत घेऊन अनिल अंबानींना मदत करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजप देशात जातीय दंगली घडवणार, योगी सरकारमधील मंत्र्याचा दावा

अस्वस्थ असलेले भाजप नेते आता स्वगृहीच राहणार

-आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी केली अटक

जयंत सिन्हांच्या मागे उभा राहिलेल्या या मुलीच्या वाकुल्या कुणासाठी??

-अर्थसंकल्प रद्द करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या