बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; बरे होणाऱ्यांची संख्याही वाढली

नवी दिल्ली | जून महिन्याच्या मध्यात भारतात कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात आली होती. त्याच कालावधी दरम्यान अनेक राज्यांनी लाॅकडाऊन शिथिल केले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी कामं सुरू झाली. अनेक ठिकाणी हाॅटेल्स, पर्यटन स्थळं, महाविद्यालये सुरू झाली. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. देशात पुन्हा रूग्णसंख्या वाढत आहे.

गेल्या 24 तासात भारतात 50 हजार 848 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1 हजार 358 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 68 हजार 817 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशभरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडाही आता तीन कोटींच्या पार गेला आहे. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्यानं काहीशी चिंता व्यक्त होत आहे. मात्र कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्यानं थोडा दिलासा मानला जात आहे.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 28 हजार 709 वर गेला आहे. देशात 2 कोटी 89 लाख 94 हजार 855 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 90 हजार 660 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 6 लाख 43 हजार 194 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 29 कोटी 46 लाख 39 हजार 511 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. लसीकरणाच्या वाढत्या वेगामुळे आता कोरोना नियंत्रणा येत आहे. तर काही ठिकाणी पुन्हा गर्दी होत असल्यानं कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे.

थोडक्यात बातम्या-

कोविशील्ड लस घेतलेल्या 11 जणांना झाला हा दुर्मिळ आजार; तज्ज्ञांचा दावा

संजय राऊत यांच्याविरोधात महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी करा- उच्च न्यायालय

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल!

भारताला मिळणार चौथी लस; ‘या’ लसीला भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता

मी हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला, त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देणं ही दुर्देवाची बाब- जितेंद्र आव्हाड

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More