बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोका वाढला! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, जाणुन घ्या मागच्या 24 तासातील आकडेवारी

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी ही गेल्या काही दिवसात दिलासादायक असल्याचं समोर आलं होतं. पण आता हा आकडा पुन्हा एकदा हळुहळु वाढत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 4 हजार 014 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 8 हजार 240 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या दिलासादायक असताना मागच्या 24 तासातील  आकडेवारी ही काही प्रमाणात वाढली असल्याचं चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 66 हजार 045 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 87 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 5 लाख 55 हजार 101 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.

रुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने कमी होत होती. पण मुंबईतील मागच्या 24 तासातील रुग्णसंख्या ही मागच्या 2 ते 3 दिवसातील सर्वात जास्त रुग्णसंख्या असल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या

‘खूपच घाई असेल तर प्रश्न पाठवा उत्तरं देते’; रश्मी शुक्ला यांचं महाराष्ट्र पोलिसांना उत्तर

सावधान! महाराष्ट्रातील कोरोनाचा धोका पुन्हा वाढला; जाणुन घ्या धक्कादायक आकडेवारी

“महाराष्ट्रात असेच कठोर निर्बंध कायम ठेवावे लागतील”; टास्क फोर्सचं मोठं वक्तव्य

ॲास्ट्रेलियन खेळाडूंचा IPL सोडण्याचा निर्णय, मात्र ॲास्ट्रेलियन पंतप्रधांनांनी त्यांना दिला मोठा झटका

मुंब्य्रातील प्राईम हॉस्पिटलला मध्यरात्री भीषण आग; 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More