राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ; केंद्राने महाराष्ट्राला दिल्या ‘या’ सूचना
मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना साथीने हाहाकार माजवला आहे. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यानंतर कोरोना रूग्णसंख्येचा आलेख खाली आला होता. अनेक देशांमध्ये पुन्हा कोरोना रूग्ण वाढल्याची माहिती असताना राज्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्ण वाढू लागले आहेत. राज्याला केंद्र सरकारकडून पत्राद्वारे काही सुचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून याठिकाणी टेस्टींग, लसीकरण यावरती अधिक भर देण्यात यावा, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव सचिन राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र पाठवून सूचना केल्या आहेत.
शुक्रवारी राज्यात 1134 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात 536 रूग्ण बरे झाले असून 3 कोरोना रूग्णांचा मृत्यु झाला आहे. तसेच राज्यात 5127 सक्रीय रूग्ण आहेत. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली होती. जर निर्बंध नको असतील तर नियमांचे पालन करा, असं आवाहन मुख्यमंंत्र्यांनी केलं होतं.
दरम्यान, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे , रायगड येथे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लसीकरण आणि टेस्टींगवर भर देण्याच्या सुचना राज्याला देण्यात आल्या आहेत. कानपूर आयटी तज्ज्ञांनी जुलै 2022 मध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून इशारा गांभीर्यांने घेणे गरजेचे आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही, असं आयुक्त इकबाल चहल म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
विधान परिषदेच्या उमेदवारी संदर्भात पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य
“मी आता वयाच्या 85 व्या वर्षात आंदोलन करायचं का?”
काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर जोरदार टीका; म्हणाले…
महाविकास आघाडीत नाराजीचा सूर; ‘या’ नेत्याचे शिवसेनेवर गंभीर आरोप
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
‘मला कोणतीही कारणं नकोत’; ‘या’ प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी सुनावलं
Comments are closed.