मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक भाजप (BJP) नेत्यांविरोधात याचिका दाखल करणारे नागपूरातील प्रसिद्ध वकील सतीश उके (Satish Uke) यांच्यावर आज ईडीने (ED) कारवाई केली. सतीश उके यांच्यावरील कारवाईनंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधातील केसमध्ये सतीश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील होते. सतीश उके यांच्या नागपूर येथील घरी ईडीने छापेमारी केली. या कारवाईनंतर नाना पटोले यांनी ट्विट करत टीका केली आहे.
मोदींच्या राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी धोरणांविरूद्ध आवाज उठविणाऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल असा संदेश दिला जात आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोलेंनी केली. तर आम्ही देश वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू, असं वक्तव्य देखील नाना पटोलेंनी केलं आहे.
दरम्यान, ईडीने सध्या सतीश उके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. चौकशी झाल्यानंतर सतीश उके यांच्या अटकेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे उके यांना खरंच अटक होणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मोदींच्या राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठविणाऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल, असा संदेश दिला जात आहे. पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू.
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 31, 2022
थोडक्यात बातम्या-
“भविष्यात नाना पटोलेंवरही धाडी पडल्यातरी मला आश्चर्य वाटणार नाही”
भाजप नेत्यांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सतीश उकेंच्या घरी ईडीची धाड
झेलेन्स्कींना सतावतेय ‘ही’ भीती, अधिकाऱ्यांना दिले काहीही न खाण्या पिण्याचे आदेश
“एकनाथ शिंदे हुशार व्यक्ती, त्यांनाच मुख्यमंत्री करा”
आधार, पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर आजच करा, अन्यथा होईल मोठं नुकसान
Comments are closed.