बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादातील सर्व महत्त्वाचे मुद्दे वाचा एकाच ठिकाणी

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार राजकारण सुरु झालंय. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

आजच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे- 

-मराठा आरक्षणाचा निर्णय सर्व पक्षांच्या एकमताने घेण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने त्याविरोधात निकाल दिला आहे. आम्ही उच्च न्यायालयात जिंकलो ते सुप्रीम कोर्टात तुम्ही हारलात. तुम्हाला लढताच आलं नाही. असं अजिबात नाही. उच्च न्यायालयात ज्या वकिलांनी बाजू मांडली. त्याच वकिलांनी आणि त्यांच्याबरोबर आणखी वकिलांना नियुक्त करुन सर्वांनी मिळून सुप्रीम कोर्टात बाजू मांडली.

-सरकार आरक्षणाच्या विरोधात असतं तर लढाई समजू शकलो असतो. पण सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने लढत आहे. पण लढाई अजून संपलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने तुमचा अधिकार नाही, असं सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता पुढचा मार्ग दाखवला आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सांगितलं आहे.

-अशोक चव्हाण यांनी याबाबत व्यवस्थित सांगितलं आहे. मराठा आरक्षणाचा निर्णयल राज्य सरकारचा नाही. त्यामुळे केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांना हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं या निकालातून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. पंतप्रधानांनी काश्मीरचे 370 कलम रद्द करताना संवेदनशीलता दाखवलं त्याच संवेदनशीलतेची आता गरज आहे.

-जो मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दाखवला आहे या निर्णयातून केंद्र सरकारचा अधिकार दाखवला आहे. आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत. ही न्याय हक्काची मागणी आहे. या मागणीचा अपमान केंद्र सरकार आणि राष्ट्रपती करणार नाहीत, अशी खात्री आहे. कुणाच्या भडकवण्याला बळी पडू नका. महारष्ट्र सरकार तुमच्या सोबत आहे. तुम्हाला न्याय मिळेल.

-मी मराठा समाजाचा धन्यवाद मानतो. त्यांनी फार सामंजसपणे निर्णय ऐकला आहे. कुठेही थयथयाच, आदळाआपट केली नाही. त्यामुळे धन्यवाद देतो. त्यांच्या नेत्यांनीही सामंजसपणे घेतलं. विशेष करुन छत्रपती संभाजीराजे यांनी अत्यंत समजंसपणे प्रतिक्रिया दिली.

-सुप्रीम कोर्टाने आपण मुंबईत आणि महाराष्ट्रात कोरोना विरोधात जी लढाई लढत आहोत त्याचं कौतुक केलं आहे. आपल्यामुळेच ते शक्य झालं. त्यामुळे मी आपणा सर्वांचा आभारी आहे. राज्यात कोरोना रुग्ण हळूहळू कमी होत आहेत. मात्र, अजून जिंकलेलो नाहीत. आता इतर राज्यही लॉकडाऊन करत आहेत. ही आता कोरोना लढाईची आवश्यकता बनली आहे.

-देशात तिसरी लाट येत आहे. आज आपल्याकडे 7 लाख सक्रिय रुग्ण होते. ही रुग्णवाढ आपण थोडीशी खाली आणली आहे. पण काही जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढ होत आहे.

-आम्हाला 200 मेट्रिक टन ऑक्सिजन हवं, असं केंद्र सरकारला सांगितलंय. पण तिसऱ्या लाटेसाठी आपण तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात 1800 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. त्यासाठी ऑक्सिजनचे प्लांट सुरु आहेत. महाराष्ट्र लवकरच याबाबत सक्षम होईल. रेमडेसिवीरसाठी देखील योग्य उपाययोजना सुरु आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत मराठा आरक्षणाबाबत दाखवा

कुणाच्या भडकवण्याला बळी पडू नका, सरकार तुमच्यासोबत आहे- उद्धव ठाकरे

मी पंतप्रधान मोदींना हात जोडून विनंती करतो की…- उद्धव ठाकरे

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

कडक सॅल्यूट! पंक्चर काढणाऱ्या 60 वर्षीय नागरिकाने दिले 90 ऑक्सिजन सिलेंडर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More