बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

मान्सून पूर्व पडलेल्या पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामाला आता वेग आला आहे. 19 ते 21 मे या कालावधीत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट (heat wave) येण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी 19 मे ते 21 मे दरम्यान विजांच्या कडकडाटा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अकोला, यवतमाळ, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट समोर!

मोठी बातमी! काँग्रेसला जोर का झटका; 50 वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या नेत्याचा भाजपत प्रवेश

“महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”

‘जसं मथुरेच्या कणाकणात कृष्ण आहे तसं…’; कंगणाचं नवं वक्तव्य चर्चेत

“महाराष्ट्र पवारांची संस्कृती शिकला तर महाराष्ट्र मातीत जाईल”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More