बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रक्तदान केल्यानं शरीराला होतात ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणुन घ्या सविस्तर

मुंबई |  कोरोना काळापासून अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित केलं जात आहे. असं म्हणातात कोणत्याही दानापेक्षा रक्तदान हे खूप मोठं आणि मोलाचं दान असतं. परंतू, काहीजण आपल्या शरिरातील रक्त कमी होईल, या भितीने रक्तदान करत नाही. तर काहीजण आपण अशक्त पडू आणि आजारी होऊ या भितीनेही रक्तदान करत नाही.

आज 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेक लोक रक्तदान करतात. तर आज आम्ही तुम्हाला रक्तदान केल्याने काय फायदे होतात याविषयी सांगणार आहोत.

रक्तदानाचे फायदे-

  • रक्तदान केल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो. रक्तात आयर्नचे प्रमाण जास्त असेल, तर हृदयरोगाचा धोका असतो. परंतू रक्तदान केल्याने रक्तातील आयर्नचं प्रमाण नियंत्रणात येतं. तसेच आयर्नचं प्रमाण नियंत्रणात आल्यानं कॅन्सरचाही धोका कमी होतो.
  • रक्तदान केल्यानंतर काही महिन्यांमध्येच लाल रक्तपेशींचा स्तर प्रमाणात येतो. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. परंतू त्यासोबत योग्य डाएट आणि व्यायाम असणं आवश्यक आहे.
  • तसेच रक्तदान केल्यानं आरोग्यदायी फायद्यांव्यतिरिक्त रक्तदान प्रक्रियेमध्ये रक्तदानापूर्वी तुमचे रक्त आणि आरोग्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी तपासली जाते, संसर्ग, आजारांची तपासणी केली जाते. रक्त चाचणीद्वारे एखादी व्यक्ती रक्तदान करण्यास सक्षम आहे की नाही, याची माहिती मिळते.
  • सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे, रक्तदान केल्यानं शरिरात नवीन रक्त तयार होतं. त्यामुळे शरीरातील पेशी लाल रक्ताच्या पेशी जास्त प्रमाणात निर्माण करायला लागतात.

थोडक्यात बातम्या-

“लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा”

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारकडून ‘ही’ मोठी तयारी सुरु!

‘भारतीय संघातील ‘हे’ 2 खेळाडू न्यूझीलंडवर पडतील भारी’- डेव्हिड वॉर्नर

“आमची महानगरपालिका निवडणूकीची सगळी तयारी झाली आहे, लवकरच दौरे सुरू होतील”

सुशांतच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंकिताने शेअर केला आठवणीतील ‘हा’ भावनिक व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More