बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लहान मुलांना कोरोना झालाय?; केंद्र सरकारच्या ‘या’ मार्गदर्शक सूचना नक्की वाचा…!

नवी दिल्ली | देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या देशात सतत कमी होत आहे. पण तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर लहान मुलांवरील उपचारासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

नव्या नियमानुसार कोरोना संसर्ग झालेल्या मुलांवर सिटी स्कॅनचा उपयोग समजदारीने आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्स सर्विसने या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

18 वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांवर रेमडेसिवीरच्या वापरावर पुरेशी सुरक्षा आणि प्रभावी आकड्यांचा अभाव आहे. यामुळे त्यांचा उपयोग करण्यापासून वाचलं पाहिजे, असं सूचनेत म्हटलं आहे. तसेच लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी स्टेरॉइडचा वापर हा घातक असल्याचं या सूचनेत म्हटलं आहे.

दरम्यान, हॉस्पिटलमध्ये दाखल गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांच्या उपचारात अतिशय बारकाईने देखरेख ठेवत स्टेरॉइड औषधाचा उपयोग करण्याची सूचना देण्यात आली आहे. ही सूचना फक्त गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांसाठीच आहे. स्टेरॉइडचा उपयोग हा योग्य वेळी केला पाहिजे, असं सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी ही कोणाची जबाबदारी?”

‘50% लहान मुलांच्या शरिरात कोरोना अँटीबाॅडी’; लसीच्या चाचणीपुर्वी धक्कादायक खुलासा

“तरुणाने भररस्त्यात फ्रान्सच्या अध्यक्षांच्या श्रीमुखात मारली, जनतेच्या संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका”

…म्हणून वयाच्या अटीमध्ये बसत नसून देखील फडणवीसांच्या पुतण्याला लस दिली गेली!

राज्यातील ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी; पुढील 24 तास पाऊस झोडपून काढणार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More