सुरत | शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी विरुद्ध बंड पुकारलं आहे. परवा झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्यानंतर त्यांनी आमदारांच्या एका गटासोबत गुजरातमध्ये तळ ठोकला आणि तिथून महाराष्ट्राच्या राजकारणाची सुत्रे हलवू लागले. यानंतर महाराष्ट्रात एकच गोंधळ उडाला आणि सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चांना उधाण आलं.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत याचा निश्चित आकडा कोणाला सांगता येत नव्हता. हा आकडा 30 असावा असा अंदाज होता. परंतु आता शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांचा फोटोच समोर आल्याने नवीन माहीती उघड झाली आहे.
सदर फोटोत आमदार बच्चू कडू, शंभुराज देसाई, राजकुमार पटेल, भारत गोगावले, महेंद्र दळवी, अनिल बाबर, महेश शिंदे, शहाजी पाटील, बालाजी कल्याणकर, ज्ञानराज चौगुले, रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपमान भुमरे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख, किशोर पाटील, सुहार कांदे, प्रदीप जयस्वाल, संजयकुमार रायमुलकर, संजय गायकवाड, बालाजी किणीकर, , शांताराम मोरे, प्रकाश आबिटकर, चिमणराव पाटील, नरेंद्र बोंडेकर, लता सोनवणे, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, विश्ननाथ भोईर आणि स्वत: एकनाथ शिंदे दिसत आहेत.
एकनाथ शिंदे या आमदारांना घेऊन नवीन पक्ष काढणार की, भाजप सोबत युती करुन सत्ता स्थापनार यावर सर्वांचं लक्ष लागून आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा’; बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
‘अडीच वर्ष सत्तेचा मलिदा चाखणारेच आता…’, संजय राऊतांची खोचक टीका
’24 तासांत मी तुमच्यासाठी वाईट झालो का?’, एकनाथ शिंदेंचा सवाल
“21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस?”, मनसेचा टोला
मोठी बातमी! एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देणार
Comments are closed.