Top News

पुण्यातील मुख्यमंत्र्यांच्या घणाघाती भाषणातील ‘महत्वाचे मुद्दे’ वाचा एकाच ठिकाणी

पुणे | एका बाजूला शिवसेनेसोबत युती करणार असल्याची चर्चा भाजपचे नेते करत असताना, दुसऱ्या बाजूला खुद्द मुख्यमंत्र्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे सांगत शिवसेनेला इशाला दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पुणे येथील घणाघाती भाषणातील ‘महत्वाचे मुद्दे’ वाचा एकाच ठिकाणी-

1.  सर्व 48 जागा आम्ही संपूर्ण ताकदीनं लढवणार.

2.  मागच्यावेळी 42 जागा जिंकल्या, यावेळी 43 जागा जिंकणार, ती 43 वी जागा बारामतीची असेल.

3.  आता चूक करायची नाही, आता बारामतीमध्ये फक्त कमळ फुलवायचं.

4.  तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये कमळ असेल.

5.  ही निवडणूक काही जणांसाठी पक्ष टिकवण्यासाठी, काहीसाठी मुलं बाळांना इस्टेबलिश करण्यासाठीची निवडणूक.

6.  2020 ते 2035 ही महत्वाची वर्ष भारताच्यासाठी…जर विकासात सातत्य राखलं तर आपण चीन आणि अमेरिकेच्या पुढे जाऊ.

9.  पण जर मनमोहन सिंग सारख सरकार आलं तर पॉलिसी पॅरलिसिसने पुन्हा नुकसान.

10.  बारामतीत यंदा कमळच फुलणार.

11.  या देशातील गरिबी ही मोठी समस्या होती, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात शेवटपर्यंत विकास पोहोचतो आहे.

12.  तासही वाया जाऊ न देणारे नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान या देशाला कायम हवे आहेत.

13.  काहींना या निवडणुकीत मुला बाळांना स्थिरावायचं आहे, ही निवडणूक देशाला योग्य दिशेची वाटचाल कायम ठेवण्यासाठी, एकवीसाव्या शतकातील भारत तयार करायचा आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-बारामतीत यंदा कमळच फुलणार, देवेंद्र फडणवीसांनी केली सिंहगर्जना

राज ठाकरेंच्या उपस्थितीत 500 आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न

सत्ता कशी मिळवावी हे प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडून शिकावं-रामदास आठवले

आसाममध्ये मोदींना दाखवले काळे झेंडे; मोदी गाे बॅकच्या दिल्या घोषणा

राष्ट्रवादीने ठरवलंय, कुठल्याही परिस्थितीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांना पाडायचं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या