बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुणाचा पगार वाढला, कुणाचा कमी?; वाचा भारतीय क्रिकेटपटूंना मिळणारा नवा पगार

नवी दिल्ली | बीसीसीआयने नुकतंच बीसीसीआयचा वार्षिक करार घोषित केला आहे. हा करार ऑक्टोबर 2020 पासून ते सप्टेंबर 2021 प्रयत्न असणार आहे. यात काही खेळाडूंचे पगार वाढले आहेत तर काही खेळाडूंची घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली आहे.

बीसीसीआयच्या वार्षिक करारात चार श्रेण्या केल्या जातात. अ+ , अ, ब आणि क अशा चार श्रेण्या असतात. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय गोलंदाजीचा स्तंभ जसप्रीत बुमराह यांना अ+ श्रेणीत स्थान कायम ठेवलं आहे. या तिघांचा पगार 7 कोटी रुपये इतका असणार आहे.

हार्दिक पंड्याची ‘ब’ गटातून ‘अ’ गटात बढती झाली आहे. तर आर अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल , मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि रिषभ पंत यांनी ‘अ’ गटात आपलं स्थान कायम ठेवलं आहे. तर भुवनेश्वर कुमार याची ‘अ’ गटातून ‘ब’ गटात घसरगुंडी झाली आहे. ‘अ’ गटातील खेळाडूंचा पगार 5 कोटी रुपये इतका असतो.

वृद्धीमान सहा, उमेश यादव आणि मयांक अग्रवाल हे ‘ब’ गटात कायम राहणार आहेत. तर शार्दूल ठाकूर याची ‘क’ गटातून ‘ब’ गटात उचलबांगडी झाली आहे. ‘ब’ गटातील खेळाडूंना 3 कोटी रुपये इतका पगार असतो.

शुभमन गिल, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांना ‘क’ श्रेणीत नव्यानं जागा मिळाली आहे. तर यजुवेंद्र चहलची एका गटाने घसरण झाली आहे. ‘क’ गटाचा पगार 1 कोटी इतका असतो. तर मनीष पांडे आणि केदार जाधव यांना कोणताही गटात समाविष्ट केलं गेलं नाही. ‘क’ गटात कुलदीप यादव, नवदीप सैनी , दिपक चाहर , हनुमा विहारी , श्रेयस अय्यर , वाशिंग्टन सुंदर , याची श्रेणी कायम राखली गेली आहे.

कोणत्या गटात कोणते खेळाडू- (पगार)

अ+ गट-  विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह. (7 कोटी)

अ गट- हार्दिक पंड्या, आर अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल , मोहम्मद शमी, इशांत शर्मा, रिषभ पंत. (5 कोटी)

ब गट- भुवनेश्वर कुमार, वृद्धीमान सहा ,उमेश यादव ,मयांक अग्रवाल, शार्दूल ठाकूर. (3 कोटी)

क गट- शुभमन गिल, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज,यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी , दिपक चाहर , हनुमा विहारी , श्रेयस अय्यर , वाशिंग्टन सुंदर. (1 कोटी)

थोडक्यात बातम्या-

हरिद्वार कुंभमेळ्यात कोरोनाचं थैमान; इतक्या जणांना झाली कोरोनाची लागण

साहेब, घरात पकडलेले उंदीर सोडायला गेलो होतो’; घराबाहेर पडलेल्या तरूणाचं पोलिसांना अजब उत्तर

‘पैसा भी और इज्जत भी’; माॅरिसच्या खेळीवर विरेंद्र सेहवागची गुगली

पीएचा जीव वाचवण्यासाठी गडकरींनी मध्यरात्री उघडायला लावलं बॅंकेचं लॅाकर, 35 लाख केले खर्च!

“पहाटेच्या शपथविधीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More